Rutuja Latke, Murji Patel  sarkarnama
मुंबई

ठाकरे गटानं दोन उमेदवारी अर्ज का दाखल केले ? ; अशी आहे रणनीती

Andheri by Election : अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीचा निकाल महाविकास आघाडी आणि भाजप-शिंदे गटासाठी महत्वाचा ठरणार आहे.

सरकारनामा ब्युरो

मुंबई :राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच ठाकरे गट- शिंदे गट अंधेरी पोट निवडणुकीच्या (andheri by election) निमित्ताने आमने-सामने उभे ठाकले आहेत. ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटांसाठी तसेच भाजपसाठीही निवडणूक अतिशय चुरशीची ठरणार आहे. (andheri by election latest news)

आगामी काळात मुंबई महापालिकेसह सर्व महत्वाच्या महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक होणार आहेत. त्यामुळे या अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीचा निकाल महाविकास आघाडी आणि भाजप-शिंदे गटासाठी महत्वाचा ठरणार आहे.

शुक्रवारी अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी तर भाजप-बाळासाहेबांची शिवसेना युतीचे उमेदवार म्हणून मुरजी पटेल यांनी उमेदवारीचा अर्ज दाखल केला आहे. दोन्ही उमेदवारांनी प्रचारास सुरवात केली आहे. पण ठाकरे गटाकडून दुसराही अर्ज दाखल करण्यात आला आहे. दिवंगत आमदार रमेश लटके यांचे निकटवर्तीय संदीप नाईक यांनीही अर्ज भरला आहे.

ठाकरे गटाने दोन अर्ज का भरले, यावरुन सध्या राजकीय विश्लेषकांमध्ये मत-मतांतर आहे. माजी मंत्री, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. ते माध्यमांशी बोलत होते. अर्ज भरल्यानंतर कुठलाही दगाफटका होऊ नये, या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं ही खबरदारी घेतल्याची चर्चा आहे.

अनिल परब म्हणाले, "निवडणुकीत हा एक नियम असतो. आयोगाच्या नियमानुसार एबी फॉर्ममध्ये पर्यायी उमेदवाराचं नाव समाविष्ट करता येऊ शकतं. अधिकृत उमेदवारानं काही कारणास्तव माघार घेतल्यास किंवा छाननीत त्याचा अर्ज बाद झाल्यास दुसरा उमेदवार अधिकृतरित्या जाहीर केला जातो. त्याच अनुषंगाने संदीप नाईक यांनी आज उमेदवारी अर्ज भरला आहे. कोणत्याही प्रकारचा ठाकरे गटाला दगाफटका होऊ नये, याची खबरदारी घेत शिवसेनेकडून दोन उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत,"

रमेश लटके यांच्या निधनानंतर ही विधानसभेची जागा रिक्त झाली होती. या जागेसाठी आता पोटनिवडणूक होत आहे. मशाल या नव्या चिन्हावर ठाकरे गट निवडणूक लढवत आहे. तर पटेल हे येथून दुसऱ्यांदा निवडणुकीच्या मैदानात आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT