नील यांच्या 'पीएचडी'वर टीका करणाऱ्यांना किरीट सोमय्यांनी सुनावलं ; म्हणाले..

kirit somaiya :नील सोमय्या यांना पीएच.डी.साठी सहा वर्षे लागली आहेत, अशी माहिती किरीट सोमय्या यांनी दिली.
Kirit Somayya
Kirit Somayyasarkarnama
Published on
Updated on

पुणे : भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांचे चिरंजीव नील सोमय्या यांना मिळालेल्या पीएच.डी बाबत सध्या काही जणांनी आक्षेप घेतला आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त केली होती. त्यावर किरीट सोमय्या (kirit somaiya) यांनी आपल्या मुलांची पाठराखण करीत टीकाकारांच्या ज्ञानावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. (kirit somaiya news update)

मुंबई विद्यापीठाला ऑगस्ट महिन्यात नील सोमय्या यांनी पीएचडीसाठी शोध प्रबंध सादर केला. दीड महिन्यात नील यांची तोंडी परीक्षा झाली. दुसऱ्याच दिवशी 1 ऑक्टोबर 2022 रोजी विद्यापीठाने नील सोमय्या यांना पीएचडी पदवी दिली, यावरून सध्या समाज माध्यमांवर चर्चा रंगला होत्या.त्यावर किरीट सोमय्यांनी भाष्य केलं आहे.

Kirit Somayya
Ashish Shelar : ठाकरेंनी पक्षाचं नाव बदलून रडकी सेना ठेवावं ; शेलारांनी डिवचलं

नील सोमय्या यांना पीएच.डी.साठी सहा वर्षे लागली आहेत, अशी माहिती शुक्रवारी नील यांचे वडील आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली. नील सोमय्या यांना मुंबई विद्यापीठाने 14 महिन्यांत पीएच.डी. मिळाली, याबद्दल खुद्द नील सोमय्या यांचे पीएचडीचे मार्गदर्शक एम. ए. खान यांनी आश्चर्य व्यक्त केले होते. अनेकांनी विद्यापीठाच्या या 'कारभारा'वर टीकेचे बाण सोडले होते.

सोमय्या यांचे पीएचडीचे मार्गदर्शक एम.ए. खान यांनीही नील यांनी सर्व प्रक्रियांचे पालन केले. मात्र,फक्त विद्यापीठाने त्यांच्याबाबत खूपच तत्परता दाखवल्याची प्रतिक्रिया दिली होती.

किरीट सोमय्या म्हणाले, "नील सोमय्याला पीएच.डी.साठी सहा वर्षे लागले. 17 सप्टेंबर 2016 रोजी मुंबई विद्यापीठ पीएच.डी. प्रवेश परीक्षा दिली. सप्टेंबर 2017 मध्ये पीएच.डी. प्रवेशासाठी रजिस्ट्रेशन केले. 1 ऑक्टोबर 2022 ला पीएच.डी.ची डिग्री मिळाली आहे. नीलचे वडील किरीट, आई मेधा सोमय्या यांना पण पीएच.डी. डिग्री मिळाली आहे. परंतु काही राजकीय नेत्यांनी अर्धवट ज्ञानाच्या आधारावर स्वतःची चेष्टा करून घ्यायची असेल, तर त्यांना देवच वाचवू शकतो,"

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Marketing Minister Jaykumar Rawal assumes charge as chairman of the newly constituted high-level board of Mumbai APMC after its elevation to National Market status.
Rajya Sabha Bypoll Maharashtra | Navneet Rana | NCP Seat
Aniket Tatkare meets Sunetra Pawar and senior NCP leaders after being elected unopposed to the Maharashtra Legislative Council.
Navi Mumbai crime
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com