Eknath Shinde, Vijay Nahata Shivsena
मुंबई

BJP vs Shivsena : मंदा म्हात्रेंच्या पराभवासाठी झटलेला नेता पुन्हा शिवसेनेत; एकनाथ शिंदेंचा भाजपला धक्का

Vijay Nahata : भाजप आमदार मंदा म्हात्रे यांच्या विरोधात अपक्ष निवडणूक लढवत त्यांच्या पराभवासाठी झटणाऱ्या विजय नहाटा यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

Hrishikesh Nalagune

Navi Mumbai : भाजप आमदार मंदा म्हात्रे यांच्या विरोधात अपक्ष निवडणूक लढवत त्यांच्या पराभवासाठी झटणाऱ्या विजय नहाटा यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. नहाटा यांचे पक्षात स्वागत करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यावर उपनेतेपदाची जबाबदारी दिली. शिवसेनेचे नेते किशोर पाटकर यांच्या मध्यस्थीने हा पक्षप्रवेश झाला.

नहाटा आधी शिवसेनेतच होते. मात्र विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाण्यासाठी उत्सुक होते. पण त्यादरम्यान भाजपमधून आलेल्या माजी आमदार संदीप नाईक यांना स्वीकारण्यात आले. त्यामुळे नाहटा यांना अपक्ष उमेदवारी लढवावी लागली.

त्यावेळी बेलापूरमध्ये महायुतीच्या मंदा म्हात्रे, महाविकास आघाडीचे संदीप नाईक, मनसेचे उमेदवार गजानन काळे आणि अपक्ष विजय नहाटा अशी लढत पाहायला मिळाली. ही लढत अत्यंत अटीतटीची ठरली. अखेरच्या क्षणी मंदा म्हात्रे केवळ 377 मतांनी विजयी झाल्या. नहाटा यांनी तब्बल 19 हजार मते घेतल्याने म्हात्रे यांना विजयासाठी अखेरच्या फेरीपर्यंत संघर्ष करावा लागला होता.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीत बंडखोरी केलेल्या नेत्यांना पु्न्हा पक्षात स्थान द्यायचे नाही, अशी भूमिका तिन्ही पक्षांनी घेतली होती. पण नहाटा यांना पक्षात घेत शिंदे यांनी एकप्रकारे भाजपला धक्काच दिला आहे. यापूर्वी ऐरोलीमध्येही माजी जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांनी बंडखोरी करीत निवडणूक लढवली होती; परंतु त्यांनाही पक्षाने स्वीकारले आहे.

हीच भूमिका ठेवून नहाटा यांनाही शिवसेनेच्या शिंदे गटाने दार उघडले आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने नाहटा यांना प्रवेश दिला असल्याचे बोलले जात आहे. तसेच नवी मुंबई महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने नाहटा यांना काम सुरू करण्याचे आदेश शिंदे यांनी दिल्याचे समजते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT