पणजी : गोव्याचे (Goa) माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर (Utpal Parrikar) यांनी पणजी विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यांना तिकीट नाकारल्यानंतर शिवसेनेने (Shiv Sena) ते अपक्ष उभे राहिल्यास पाठिंबा देऊ असं जाहीर केलं होतं. शिवसेनेकडून दिलेला हा शब्द पाळण्यात आला असून शैलेंद्र वेलिंगकर (Shailendra Velingkar) यांनी सोमवारी आपला अर्ज मागे घेतला. त्यामुळे पर्रीकर यांची ताकद निश्चितच वाढणार असल्याचे बोलले जात आहे. (Goa Election 2022)
शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी रविवारीच गोव्यात वेलिंगकर हे अर्ज मागे घेतील, अशी घोषणा केली होती. त्यानुसार आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी वेलिंगकर यांनी माघार घेतल्याची माहिती राऊत यांनी ट्विटरवरून दिली. पर्रीकर हे भाजप सोडण्याआधीपासूनच राऊत यांनी त्यांना अपक्ष उभे राहिल्यास पाठिंबा देऊ, असे म्हटले होते.
राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, आम्ही शब्द पाळला आहे. पणजीमधून शिवसेनेचे उमेदवार शैलेंद्र वेलिंगकर यांनी माघार घेतली आहे. केवळ एवढेच नव्हे तर आमचे कार्यकर्ते उत्पल पर्रीकर यांनी संपूर्णपणे पाठिंबा देतील. पणजीची लढाई ही केवळ निवडणुकीसाठी नाही तर गोव्यातील राजकारण शुध्द करण्यासाठी आहे, असं आम्ही मानतो, असे राऊत म्हणाले आहेत.
कोण आहेत शैलेंद्र वेलिंगकर?
शैलेंद वेलिंगकर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी गोवा संघचालक सुभाष वेलिंगकर यांचे पुत्र आहेत. ते गोव्यातील परशुराम सेनेचे प्रमुखही आहेत. आरएसएसचे बंडखोर नेते म्हणूनही त्यांची ओळख आहे. त्यामुळे अनेक हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचा त्यांना पाठिंबा आहे वेलिंगकर यांनी अनेकदा भाजपवर उघडपणे टीका केली आहे. नोकरभरती घोटाळ्यासह विविध भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये त्यांनी आवाज उठवला आहे. आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्याविरोधात त्यांनी जनहित याचिकाही दाखल केली होती. स्थानिक शेतकरी आंदोलनातही त्यांनी सहभाग घेतला होता.
दरम्यान, उत्पल पर्रीकर यांनी अपक्ष अर्ज दाखल केल्याने गोव्यातील राजकारणाला (Goa Politics) वेगळं वळण मिळालं आहे. त्यामुळे भाजपची पणजी मतदारसंघात डोकेदुखी वाढली आहे. उत्पल पर्रीकर यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेण्याची तयारी दर्शवली होती. त्यासाठी भाजपसमोर त्यांनी एकमेव अट ठेवली होती. ती अट म्हणजे, भाजपने पणजीतून चांगला उमेदवार द्यावा. भाजपने चांगले उमेदवार दिल्यास ते माघार घेतील, असे त्यांनी जाहीरपणे म्हटले होते. भाजप सोडण्याचा निर्णय अतिशय अवघड होता, असेही त्यांनी म्हटले होते. परंतु, भाजपने पणजीतून बाबूश मोन्सेरात यांची उमेदवारी कायम ठेवल्याने पर्रीकर यांनी लढण्याचा निर्णय कायम ठेवला. (Utpal Parrikar News Updates)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.