Ashok Dhodi  sarkarnama
मुंबई

Ashok Dhodi Murder Case : सख्खा भाऊ पक्का वैरी! शिवसेना नेत्याचा भावानेच केला घात, अशोक धोडी यांच्या मृत्युचं गूढ उलगडलं

Ashok Dhodi latest news : बेपत्ता शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी (Ashok Dhodi) यांची हत्या सख्ख्या भावानेच केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अशोक धोडी हे मुंबईतून घरी परत येत असताना त्यांच्या लहान भावाने त्यांचं अपहरण करून हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Jagdish Patil

Mumbai News, 01 Feb : बेपत्ता शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी (Ashok Dhodi) यांची हत्या सख्ख्या भावानेच केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अशोक धोडी हे मुंबईतून घरी परत येत असताना त्यांच्या लहान भावाने त्यांचं अपहरण करून हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

शिवसेना(Shivsena) पदाधिकारी अशोक धोडी हे 20 जानेवारीपासून बेपत्ता होते, याबाबतची तक्रार त्यांच्या वडिलांनी पोलिसांत केली होत. त्यानंतर पोलिसांनी अपहरणाची तक्रार दाखल करत तपासाला सुरूवात केली

त्यानंतर पालघर पोलिसांना तपास केला असता गुजरातमधील (Gujarat) भिलाड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील येणाऱ्या सरिग्राम येथील एका बंद दगड खाणीच्या पाण्यात 40 फूट खोल अशोक धोडी यांचा मृतदेह आणि त्यांची लाल रंगाची ब्रीझा कार आढळून आली. त्यानंतर त्यांची हत्या ही कौटुंबिक वादातून त्यांच्या भावानेच केल्याची माहिती समोर आली.

तर अशोक धोडी आणि भावाच्या वादाची वेगवेगळी कारण असल्याचंही सांगितलं जात आहे. मात्र, त्यांचा आरोपी भाऊ अविनाश धोडीचा दारू तस्करीचा अवैध धंदा असून याच धंद्यात अशोक धोडी अडचण ठरत असल्याने त्यांची अपहरण करून हत्या केल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, या प्रकरणात आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.

मात्र, मुख्य आरोपी अविनाश धोडीसह इतर तीन आरोपी अद्याप फरार आहेत. या आरोपींचा पालघर पोलिसांकडून शोध सुरू आहे. तर अशोक धोडी यांचा मृतदेह शोधण्यात पोलिसांना यश आल्याने अशोक धोडी यांचा मुलगा आकाश धोडी यांनी पोलिस प्रशासनाच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केला. मात्र, आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करत त्यांनी कुटुंबीयांनाही आरोपींपासून धोका असल्याची भीती व्यक्त केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT