Shiv Sena Operation Tiger : शिवसेनेचे 'ऑपरेशन टायगर'; एकनाथ शिंदेंची पुण्यासाठी वेगळी रणनीती

Eknath Shinde Pune Strategy News : गेल्या महिन्यात ठाकरे सेनेतील पाच नगरसेवक शिंदे यांच्या शिवसेनेऐवजी भाजपसोबत गेल्याचे शिंदेंच्या जिव्हारी लागले होते. त्यामुळे आता येत्या काळात शिंदे पिता-पुत्रांनी पुण्यातील शिवसेना मजबूत करण्यासाठी वेगळी रणनीती आखली आहे.
Eknath Shinde
Eknath Shinde sarkarnama
Published on
Updated on

Pune news : राज्यातील विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे पडद्यामागून ऑपरेशन ‘टायगर’ सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. त्यानुसार उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील आणि काँग्रेसचे काही नेते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याचीही चर्चा जोरात सुरू आहे. गेल्या महिन्यात ठाकरे सेनेतील पाच नगरसेवक शिंदे यांच्या शिवसेनेऐवजी भाजपसोबत गेल्याचे शिंदेंच्या जिव्हारी लागले होते. त्यामुळे आता येत्या काळात शिंदे पिता-पुत्रांनी पुण्यातील शिवसेना मजबूत करण्यासाठी वेगळी रणनीती आखली आहे.

गेल्या अडीच वर्षांपूर्वी शिवसेनेत (Shivsena) पडललेया उभ्या फुटीनंतर राज्यभरात सर्वत्र मोठ्याप्रमाणात शिवसेनेतील खासदार, आमदार व पदधिकारी व शिवसैनिक मोठ्या प्रमाणात शिंदे यांच्या शिवसेनेसोबत आले होते. मात्र, पुणे जिल्ह्यात त्या तुलनेत शिंदे शिवसेनेकडे कमी प्रमाणात इनकमिंग झाले होते.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर गेल्याच महिन्यात ठाकरे सेनेतील पाच नगरसेवक शिंदे यांच्या शिवसेनेऐवजी भाजपसोबत गेल्याचे एकनाथ शिंदेंच्या जिव्हारी लागले होते. त्यामुळे आता येत्या काळात शिंदे पिता-पुत्रांनी पुण्यातील शिवसेना मजबूत करण्यासाठी वेगळी रणनीती आखली असून येत्या काळात पुण्यात शिवसेना मजबूत करून बळकटी देण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे.

Eknath Shinde
Suresh Dhas : गुणरत्न सदावर्तेंच्या टार्गेटवर आमदार धस, 'त्या' खुनाच्या प्रकरणात थेट नाव घेतलं, म्हणाले, पुरावे...

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (EKnath shinde) शिवसेनेने पडद्यामागून ऑपरेशन ‘टायगर’ सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. त्यानुसार शिवसेनेच्या वाटेवर असलेल्या नेत्यांमध्ये काँग्रेसच्या एका माजी आमदाराचे नाव घेतले जात आहे. त्यासोबतच हडपसर येथील ठाकरे गटाचे माजी आमदार महादेव बाबर, कोथरूड येथील ठाकरे गटाचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांच्या नावाची सध्या चर्चा सुरू आहे.

त्यासोबतच आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पुणे महापालिकेच्या दृष्टीने तयारी सुरु केली आहे. त्यानुसार काही माजी नगरसेवक सुद्धा शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु आहे.

Eknath Shinde
Beed Police : बीडच्या पोलीस अधिक्षकांची मोठी कारवाई, दोन पोलिसांचे निलंबन; काय आहे प्रकरण ?

महायुतीमध्ये मुंबईतील महापालिका निवडणूक युतीमध्ये लढवली जाणार आहे तर इतरत्र मात्र ही निवडणूक स्वबळावर लढली जाण्याची शक्यता गृहीत धरून शिवसेना शिंदे गटाकडून तयारी केली जात आहे. त्याच अनुषंगाने एकनाथ शिंदे यांनी आता पुण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. गेल्या काही दिवसांत त्यांचे पुण्याकडे दुर्लक्ष झाले होते. त्याचा फटका काही प्रमाणात शिवसेनेला बसला होता. मात्र, येत्या काळात त्यांनी शिवसेनेच्या नेत्यांना अंग झटकून कामाला लागण्याच्या सूचना केल्या आहेत. त्या दृष्टिने एकनाथ शिंदे यांनी पुण्यातील दौरेही वाढवले आहेत.

Eknath Shinde
Beed Politics Video : अजितदादांच्या समोरच बजरंग सोनवणे धनंजय मुंडे भिडले! दहशतीचा मुद्दा निघालाच...

पुणे महापालिकेत एकेकाळी शिवसेनेचे 26 नगरसेवक होते. गेल्या दहा वर्षांत शिवसेनेच्या नगरसेवकांची संख्या कमी झाली असली तरी शहरात त्यांना मानणारा शिवसेनेचा मतदार मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे आगामी महापलिका निवडणुकीच्या दृष्टीने त्याचा फायदा करून घेण्यासाठी जुन्या-जाणत्या नेतेमंडळींना सोबत घेऊन पक्ष मजबुतीसाठी वेगळी रणनीती आखली जाणार आहे.

Eknath Shinde
Ajit Pawar : पुणे वाहतूक कोंडीत तिसऱ्या क्रमांकावर, अजितदादा 'अ‍ॅक्शन मोड'वर, 100 दिवसांत...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com