Shankaracharya Avimukteshwaranand, Uddhav Thackeray, Eknath Shinde  Sarkarnama
मुंबई

Shivsena News : विश्वासघाताचा धर्माशी संबंध काय? शिंदेंच्या नेत्याचा शं‍कराचार्यांच्या वक्तव्यावर आक्षेप

Uddhav Thackeray And Shankaracharya Avimukteshwaranand Meeting : "मुख्यमंत्री कोण होणार आणि कोण नाही? हे जनता ठरवेल, शंकराचार्य नाही. उद्धव ठाकरेंनी भाजप सोडला तो विश्वासघात नाही का?"

Jagdish Patil

Shivsena News : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी भेट दिली. या भेटी दरम्यान शं‍कराचार्यांनी एक वक्तव्य केलं होतं, ज्याची चर्चा सध्या राज्यासह देशभरात मोठ्या प्रमाणात सुरु आहे.

"उद्धव ठाकरेंना धोका दिल्याने त्यांचे मुख्यमंत्री पद गेलं आहे. त्यांनी आता पुन्हा मुख्यमंत्री व्हावं." असं शं‍कराचार्यांनी म्हटलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. शिवसेना ठाकरे गटाने शं‍कराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांच्या वक्तव्याचं समर्थन केलं असलं तरी विरोधकांनी आणि खासकरुन शिंदेंच्या शिवसेनेने शंकराचार्यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला आहे.

मुख्यमंत्री कोण होणार आणि कोण नाही? हे जनता ठरवेल, शंकराचार्य नाही अशा शब्दात शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांनी शं‍कराचार्यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला आहे. शिवाय उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) भाजप सोडला तो विश्वासघात नाही का? असा प्रश्न निरुपम यांनी उपस्थित केला.

या संदर्भात बोलताना निरुपम म्हणाले, "शंकराचार्य हे श्रद्धेचे पद आहे. शंकराचार्यांनी ज्या पद्धतीने राजकीय भाष्य केले, त्यावर आमचा आक्षेप आहे. उद्धव ठाकरे यांनी भाजप (BJP) सोडला, हा विश्वासघात नाही का? जगतगुरु शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद हे धार्मिक कमी आणि राजकीय जास्त आहेत.

ठाकरेंना भेटणं हा त्यांचा वैयक्तिक निर्णय असू शकतो, यावर आक्षेप नाही. मात्र त्यांनी शिवसेनेच्या अंतर्गत वादावर राजकीय भाष्य करणे टाळायला पाहिजे होते. ते त्यांना शोभत नाही. मुख्यमंत्री कोण होणार आणि कोण नाही हे जनता ठरवेल, शंकराचार्य नाही."

विश्वासघाताचा धर्माशी संबंध नाही

तसेच जे लोक विश्वासघात करतात ते हिंदू असू शकत नाहीत. हे फार विचित्र तर्क आहे. हिंदू पौराणिक कथा आणि इतिहासात विश्वासघाताची अनेक उदाहरणे आहेत. तो हिंदू नव्हता का? विश्वासघात हा मानवी दुर्गुण आहे. त्याचा कोणत्याही धर्माशी संबंध नाही, अशा शब्दात निरुपम यांनी शं‍कराचार्यांवर निशाणा साधला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT