Mahant Narayangiri : शं‍कराचार्य- उद्धव ठाकरे भेटीवर महंत नारायणगिरींचा आक्षेप, म्हणाले, 'देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री...'

Mahant Narayangiri On Shankaracharya Avimukteshwaranand uddhav Thackeray : महंत नारायणगिरी म्हणाले, शंकराचार्य साधारण व्यक्तींकडे कधी जात नाही. मात्र उद्योगपती मोठ्या विवाहात जातात. उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाला धोका दिला.
 uddhav Thackeray Mahant Narayangiri  Shankaracharya Avimukteshwaranand
uddhav Thackeray Mahant Narayangiri Shankaracharya Avimukteshwaranand sarkarnama
Published on
Updated on

Mahant Narayangiri News : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद हे सोमवारी दाखल झाले होते. त्यांनी उद्धव ठाकरेंना धोका दिला म्हणून त्यांचे मुख्यमंत्री पद गेले, असे वक्तव करत ठाकरे यांनी पुन्हा मुख्यमंत्री व्हावे, असे म्हटले. उद्धव ठाकरे-शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांच्या भेटीवर महंत नारायणगिरी यांनी आक्षेप घेतला आहे.

उद्धव ठाकरे विद्रोही सोबत मिळालेत. त्यांच्या घरी जात त्यांना आशीर्वाद देणे आणि भेट घेणे चुकीचं आहे, असे म्हणत महंत नारायणगिरी यांनी शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांच्या भेटीवर आक्षेप घेतला.

महंत नारायणगिरी म्हणाले, श्रीशंकराचार्यजी उद्धव ठाकरेंकडे गेले होते. शंकराचार्य साधारण व्यक्तींकडे कधी जात नाही. मात्र उद्योगपती मोठ्या विवाहात जातात. उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाला धोका दिला. नाहीतर देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis मुख्यमंत्री बनणार होते.

 uddhav Thackeray Mahant Narayangiri  Shankaracharya Avimukteshwaranand
Video Vishalgad Fort : मोठी बातमी! विशाळगडावर जाण्यापासून शाहू महाराजांसह नेत्यांना पोलिसांनी रोखलं

उद्धव ठाकरेंनी Uddhav Thackeray बाळासाहेबांच्या विचारधारेला तिलांजली दिली आणि विरुद्ध विचारधारेसोबत जुळलेत.शंकाराचार्य अशा लोकांच्या घरी जाऊन म्हणत आहेत की उद्धव ठाकरेंना धोका दिला मात्र उद्धव ठाकरेंनी हिंदू समाजाला धोका दिला आहे, असे नारायणगिरी यांनी म्हटले आहे.

...संत मोठा नाही

शंकराचार्यंचा आदर करतो. पण धर्म आणि राष्ट्रापेक्षा कोणताही मोठा संत नसतो.आमचे काम पूजापाठ करण्याचे आहे. जय पराजय हे आम्ही सांगायला नको, ते काम जनतेचे आहे. आम्ही कोणाला धोकेबाज म्हणतो, विश्वासघातकी म्हणतो, अशी विधाने करतो विचार केला पाहिजे, असे देखील नारायणगिरी यांनी म्हटले आहे.

 uddhav Thackeray Mahant Narayangiri  Shankaracharya Avimukteshwaranand
Vishalgarh Encroachment Case : इम्तियाज जलील तेव्हा तुमचा कंठ का फुटला नाही? अंबादास दानवे यांनी सुनावले...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com