Sanjay Raut Latest News Sarkarnama
मुंबई

जामीन मंजूर होताच राऊत आधी गोंधळले, मग भावूक झाले अन् पाणावलेल्या डोळ्यांनी म्हणाले...

Sanjay Raut Latest News : ईडीच्या केसमध्ये संजय राऊत यांना १०० दिवासांनी जामीन मंजूर झाला आहे.

सरकारनामा ब्यूरो

Sanjay Raut Latest News : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना 100 दिवसानंतर जामीन मंजूर झाला आहे. राऊतांना जामीन मंजूर होताच, शिवसैनिकांनी एकच जल्लोषाच केला. न्यायालयाच्या बाहेरही टाळ्यांचा कडकडाट झाला. अशातच जामीन मंजूर झाल्यानंतर राऊतांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. आता मी पुन्हा लढेन, अशा निर्धार राऊत यांनी व्यक्त केला.

राऊतांच्या जामीन अर्जावर आज (ता. ९) मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष पीएमएल कोर्टाने निकाल दिला. त्या वेळी सर्वांचे लक्ष न्यायालयाच्या निकालाकडे लागले होते. राऊतांना जामीन मंजूर होताच टाळ्यांचा कडकडाट झाला. मात्र, त्यावेळी राऊत मात्र याबाबत गोंधळात पडले. त्यांना काही क्षण काय झाले, हेच लवकर कळाले नाही. त्या वेळी त्यांच्या वकिलांनी त्यांना जामीन मंजूर झाल्याची माहिती दिली.

क्षणार्धातच राऊतांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. त्यांनी न्यायालयाचे आभार मानले. 'आता मी पुन्हा लढेन, न्यायालयाचे आभार, न्यायदेवतेवर माझा पूर्ण विश्वास होता, अशी मोजकीच प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. मात्र, ती अत्यंत बोलकी होती. राऊतांच्या जामीनावरील सुनावणी वेळी त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. न्यायालयाचा कुटुंबीयही भावूक झाले होते. न्यायालयात सुनावणी वेळी राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत, मुलगी आणि त्यांचे भाऊ उपस्थित होते.

राऊतांना जामीन मंजूर होणे, हा ठाकरे गटासाठी मोठा दिलासा आहे. एवढेच नाहीतर राऊतांना जामीन मिळाल्यानंतर सर्वसामान्यांमध्येही आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. राऊत यांना जामीन मिळताच न्यायालायच्या देखील टाळ्यांचा कडकडाट झाल्याचे पाहायला मिळाले. 100 दिवसांनी राऊतांना जामीन मंजूर झाला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT