Devendra Fadnavis-Sanjay Raut  sarkarnama
मुंबई

'फडणवीसांच्या ऐकण्यात व पहाण्यात काही तरी दोष निर्माण झालाय,संजय राऊत मर्द शिवसैनिक आहे'

BJP|Devendra Fadnavis|Sanjay Raut|Shivsena : विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला शिवसेना नेते संंजय राऊतांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : भाजप (BJP) नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची मुंबई पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेकडून फोन टॅपिंग आणि पोलिस बदली भ्रष्टाचार प्रकरणातील गोपनीय महिती उघड केल्याप्रकरणी सुमारे दोन तास चौकशी करण्यात आली. ही चौकशी झाल्यानंतर फडणवीसांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पुन्हा महाविकास आघाडी सरकार व शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर हल्लाबोल केला आहे. यावर लगेच राऊतांनी ट्विटरच्या माध्यमातून फडणवीसांच्या टिकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

राऊत आपल्या ट्विटमध्ये म्हणाले, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या ऐकण्यात व पहाण्यात काही तरी दोष निर्माण झालाय. संजय राऊत मर्द शिवसैनिक आहे. घाबरण्याचा प्रश्नच नाही. केंद्रीय तपास यंत्रणा किती खोटे पणाने कारवाया करतात याचा पोलखोल करण्यासाठी मी दोन पत्रकार परिषद घेतल्या. पुराव्यासह. इतकेही खोटे बोलू नका, अश्या शब्दात त्यांनी फडणवीसांवर पलटवार केला आहे.

मी खुलेपणाने बोललो की मी चौकशीला जायला तयार आहे. राऊत रोज घाबरून पत्रकार परिषद घेतात. रोज केंद्रीय तपास यंत्रणांवर आरोप करतात. मी तर सांगितलं की मी यायला तयार आहे. कुठे बोलवायचे तिथे बोलवा. त्यांच्यात हिंमत आहे का? ते रोज पत्रकार परिषदेत म्हणतात मला का बोलावलं? मला का बोलावलं? याचं उत्तर त्यांनी दिलं पाहजे, अशी शब्दात फडणवीसांनी राऊतांवर टीका केली होती. त्याच्या याच टीकेला राऊतांनी प्रत्युत्तर दिले आहे.

दरम्यान, फडणवीस यांच्या बंगल्यावर झालेल्या चौकशीवरून संजय राऊत यांनी भाजप आणि फडणवीसांवर टीका केली होती. कमाल आहे! काही लोक व काही राजकीय पक्ष स्वता:ला कायद्यापेक्षा मोठे का समजत आहेत? महाराष्ट्रात अनेक मंत्री आणि लोकप्रतिनधींनीना राजकीय सुडा पोटी केंद्रीय तपास यंत्रणांनी चौकशीला बोलावले व ते हजर झाले. लोकशाहीत विशेष अधिकार कोणालाच नसतो. कायद्यापुढे सगळे समान आहेत. मग हा तमाशा का?, अश्या शब्दात राऊतांनी भाजप आणि फडणवीसांना डिवचले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT