फडणवीसांच्या चौकशीवर राऊतांची टीका; म्हणाले, कायद्यापुढे सगळे समान मग हा तमाशा का?

Shivsena|Sanjay Raut|Devendra Fadnavis : शिवसेना नेते संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.
Sanjay Raut and Devendra Fadnavis
Sanjay Raut and Devendra Fadnavissarkarnama
Published on
Updated on

मुंबई : भाजप नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची मुंबई पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेकडून फोन टॅपिंग आणि पोलिस बदली भ्रष्टाचार प्रकरणातील गोपनीय महिती उघड केल्याप्रकरणी सुमारे दोन तास चौकशी करण्यात आली. मात्र, ही चौकशी सुरु असताना शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एक ट्विट करत फडणवीस आणि भाजपवर (BJP) जोरदार टीका केली आहे. फडणवीसांच्या बंगल्यावर जाऊन करण्यात आलेली चौकशी राऊतांना आवडली नसल्याने त्यांनी याबाबत आपली नाराजी व्यक्त करत लोकशाहीत विशेष अधिकार कोणालाच नसतो. कायद्यापुढे सगळे समान आहेत. मग हा तमाशा का? असा सवाल उपस्थित करत भाजप आणि फडणवीसांवर टीका केली आहे.

Sanjay Raut and Devendra Fadnavis
"फडणवीसांना यापूर्वी ६ वेळा नोटीस, दंग्याची गरज नाही"; गृहमंत्र्यांनी भाजपला सुनावले

राऊत आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, कमाल आहे! काही लोक व काही राजकीय पक्ष स्वता:ला कायद्यापेक्षा मोठे का समजत आहेत? महाराष्ट्रात अनेक मंत्री आणि लोकप्रतिनधींनीना राजकीय सुडा पोटी केंद्रीय तपास यंत्रणांनी चौकशीला बोलावले व ते हजर झाले. लोकशाहीत विशेष अधिकार कोणालाच नसतो. कायद्यापुढे सगळे समान आहेत. मग हा तमाशा का?, असे आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. राऊतांच्या या टीकेवर भाजपकडून काय उत्तर येते हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

Sanjay Raut and Devendra Fadnavis
Video : फडणवीसांविषयी बोलताना आंबेडकरांची जीभ घसरली...

दरम्यान, फडणवीस यांची चौकशी सुरू असताना राज्यभरात भाजपकडून आंदोलन केले जात होते. पोलिसांनी फडणवीसांना पाठवलेल्या नोटीशीची भाजप कार्यकर्त्यांकडून होळीही करण्यात आली. तर भाजपचे प्रमुख नेते फडणवीसांच्या बंगल्यावर उपस्थित आहेत. डीसीपी हेमराज सिंग राजपूत, एसीपी नितीन जाधव आणि दोन पोलीस निरीक्षकांच्या पथकाने फडणवीसांचा जबाब नोंदवला. या चौकशीतून काय निष्पन्न होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असतांना फडणवीस माध्यमांशी बोलणार असून यावर काय प्रतिक्रिया देतात हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com