Sanjya Raut, Sharad Pawar Sarkarnama
मुंबई

सोमय्यांच्या पत्रकार परिषदेनंतर शरद पवारांचा थेट राऊतांना फोन!

सरकारनामा ब्युरो

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची वाईन व्यवसायात भागीदारी असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केला आहे. सोमय्यांनी रविवारी सकाळी पत्रकार परिषद घेत या भागिदारीची कागदपत्रेही दाखवली. त्यानंतर राऊत यांनी सोमय्यांच्या या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच सोमय्यांच्या या आरोपानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचाही आपल्याला फोन आला होता, असा दावा राऊतांनी केला आहे.

राऊत गोव्यात दाखल झाले असून पणजी विमानतळाबाहेर माध्यमांशी बोलताना त्यांनी सोमय्यांसह भाजपवर टीका केली. एकाद्या कुटुंबातील कोणी व्यवसाय करत असेल तर गुन्हा आहे का, असा सवाल करत राऊत म्हणाले, आमची जर एखादी वायनरी असले तर ती त्यांनी ताब्यात घेऊन स्वत: चालवावी. एकाद्या कुटुंबातील कोणी व्यवसाय करत असेल तर गुन्हा आहे का? बँकांना लुबाडणे, चोऱ्या करणे यापेक्षा कष्ट करणे कधीही चांगले. पण भाजपचे थोतांडी लोक काहीही म्हणतात. मला आता शरद पवारसाहेबांचाही फोन होता. तेही हसत होते, असे राऊत यांनी सांगितले.

अमित शहांचा मुलगा केळं विकतो?

अशोक गर्ग (Ashok Garg) माझे मित्र आहेत. मुली एखाद्या कंपनीत संचालक असणे गुन्हा आहे का? किरीट सोमय्यांची मुलं काय चने-शेंगदाणे विकतात का? भाजपच्या (BJP) नेत्यांची मुलं केळी विकतात का, अमित शहांचा (Amit Shah) मुलगा केळं विकतो, सफरचंद विकतो, ढोकळा विकतो, काय विकतो काय? कुणाची मुलं काय विकतात, हा व्यक्तिगत प्रश्न आहे. देवेंद्र फडणवीस व त्यांच्या पक्षाच्या नेत्यांची मुलं ते वांद्राच्या रस्त्यावर किंवा पेडर रोडच्या रस्त्यावर स्टॉल टाकरणार आहे का, की डान्स बार टाकणार आहेत...नाचवायला, अशा खरमरीत शब्दांत राऊतांनी टीका केली.

भाजपच्या लोकांनी हे धंदे बंद करावेत. महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपच्या लोकांनी हे घाणेरडे राजकारण सुरू केले आहे, ते त्यांच्यावर उलटल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्राच्या राजकारणाला एक संस्कार आहे. तुम्ही आम्हाच्या घरापर्यंत, मुलाबाळांपर्यंत जाता. तुमची मुलं काय करतात ते बघा. आमची मुलं तुमच्याप्रमाणे ड्रग्जच्या आाहारी गेलेली नाहीत, असा निशाणा राऊतांनी साधला. वाईनला मान्यता हा शेतकरी हिताचा प्रश्न आहे. कोणाची भागिदारी असेल तर सरकारचे धोरण त्या व्यक्तीसाठी असते का? भाजपच्या किती नेत्यांचे साखर कारखाने आणि वायनरी आहेत, ते पहा, असं सांगत राऊतांनी भाजपच्या नेत्यांनाच आव्हान दिलं.

सोमय्यांनी कोणते आरोप केले?

सोमय्या यांनी रविवारी पत्रकार परिषद घेत राऊत हे काही महिन्यांपुर्वीच वाईन व्यवसायात आल्याचा दावा केला आहे. संजय राऊत परिवाराने काही महिन्यांपूर्वी वाईन व्यवसायातील अशोक गर्ग या मोठ्या उद्योगपतीसोबत बिझनेस पार्टनरशिप सुरू केली आहे. राऊतांच्या दोन्ही मुली दोन्ही कंपनयांमध्ये पार्टनर झाल्या. या ग्रुपमध्ये दुसरे कोणीही पार्टनर नाही, असा दावा सोमय्या यांनी केला आहे.

अशोक गर्ग हे 2006 पासून मॅगपी ग्रुप चालवतात. 2010 मध्ये त्यांनी अजून एक कंपनी सुरू केली. या दोन्ही कंपन्यांचा व्यवसाय हा हॉटेल, क्लब, पब यांना वाईन वितरित करण्याचा आहे. महाराष्ट्रात अशोक गर्ग यांची मोनोपॉली आहे. फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये त्यांचाच माल जास्त प्रमाणात जातो. जवळपास 100 कोटींची वार्षिक उलाढाल आहे. 16 एप्रिल 2021 पर्यंत त्यांचे कुणाचेही जॉईंट व्हेंचर नव्हते. पण त्यानंतर संजय राऊत यांनी यांचा ग्रुपशी करार केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT