संजय राऊत वाईन व्यवसायात; किरीट सोमय्यांनी पुरावेच दाखवले

महाराष्ट्रात सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला राज्य सरकारने परवानगी दिल्यानंतर वाद निर्माण झाला आहे.
Sanjay Raut, Kirit Somaiya
Sanjay Raut, Kirit Somaiyasarkarnama
Published on
Updated on

मुंबई : महाराष्ट्रात सुपर मार्केटमध्ये वाईन (Wine) विक्री करण्यासाठी ठाकरे सरकारने (Thackeray Government) नुकतीच परवानगी दिली आहे. त्यावरून राजकीय वातावरण तापलं आहे. भाजपसह (BJP) इतर अनेक संघटनांनी या निर्णयाला जोरदार विरोध केला आहे. तर सत्ताधारी नेत्यांकडून वाईन ही दारू नसल्याचे सांगत निर्णयाचे समर्थन केले जात आहे. या वादातच आता भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे.

सोमय्या यांनी रविवारी पत्रकार परिषद घेत राऊत हे काही महिन्यांपुर्वीच वाईन व्यवसायात आल्याचा दावा केला आहे. याबाबतची कागदपत्रेही त्यांनी माध्यमांसमोर सादर केली. संजय राऊत परिवाराने काही महिन्यांपूर्वी वाईन व्यवसायातील अशोक गर्ग (Ashok Garg) या मोठ्या उद्योगपतीसोबत बिझनेस पार्टनरशिप सुरू केली आहे. राऊतांच्या दोन्ही मुली दोन्ही कंपनयांमध्ये पार्टनर झाल्या. या ग्रुपमध्ये दुसरे कोणीही पार्टनर नाही, असा दावा सोमय्या यांनी केला आहे.

Sanjay Raut, Kirit Somaiya
भय्यू महाराजांचे दोन IAS अधिकाऱ्यांसह 12 तरूणींशी संबंध; षडयंत्राचा एका फोनने पर्दाफाश

अशोक गर्ग हे 2006 पासून मॅगपी ग्रुप चालवतात. 2010 मध्ये त्यांनी अजून एक कंपनी सुरू केली. या दोन्ही कंपन्यांचा व्यवसाय हा हॉटेल, क्लब, पब यांना वाईन वितरित करण्याचा आहे. महाराष्ट्रात अशोक गर्ग यांची मोनोपॉली आहे. फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये त्यांचाच माल जास्त प्रमाणात जातो. जवळपास 100 कोटींची वार्षिक उलाढाल आहे. 16 एप्रिल 2021 पर्यंत त्यांचे कुणाचेही जॉईंट व्हेंचर नव्हते. पण त्यानंतर संजय राऊत यांनी यांचा ग्रुपशी करार केला.

मॅगपी या कंपनीचे आधीचे नाव मादक प्रायव्हेट लिमिटेड असे होते. संजय राऊत यांचे कारनामे महाराष्ट्राच्या जनतेला दाखवत आहे. या कंपनी व्यवसाय दारूचा नव्हता. मॅगपी ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी पंधरा वर्षांपासून वाईन वितरित करत आहे. पण 16 एप्रिल रोजी राऊतांनी जॉईंट व्हेंचर केल्यानंतर 12 जानेवारी 2022 रोजी व्यवसाय बदलत असल्याचे कंपनी मंत्रालयाला कळवले. त्यानंतर काही दिवसांतच महाराष्ट्रात सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला परवानगीचा निर्णय घेतला, असे सोमय्या यांनी सांगितले.

दरम्यान, राऊत यांनीही वाईन ही दारू नसल्याचे म्हटल्याचे सांगत सोमय्या यांनी राऊतांना व्यवसायाबाबत उत्तर देण्याचे आव्हान दिले आहे. उद्धव ठाकरे यांच्या सरकार व परिवाराचे कारनामे फक्त पैसे गोळ्याकरण्यासाठी आहे. महाराष्ट्राला मद्यराष्ट्र बनवायला निघाले आहेत. राऊतांनी मॅगपी ग्रुपच्या अशोक गर्ग यांच्यासोबत पार्टनर झाले आहेत. त्यांच्या कन्या, पत्नी किती व्यवसायात अधिकृतपणे पार्टनर आहेत, याबाबत राऊतांनी खुलासा करावा, असे सोमय्या म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com