Raj Thackeray, Sanjay Raut  sarkarnama
मुंबई

आम्ही नक्कीच त्यांना मदत केली असती ; राज ठाकरेचं नेतेपद राऊतांना मान्य ?

भाजप प्रत्येकवेळी महाराष्ट्रातील नेत्यांना वापरून घेत आहे. त्यातलाच हा प्रकार दिसतोय.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पाच जूनचा अयोध्या दौरा स्थगित केला आहे. राज ठाकरेंच्या या निर्णयाबाबत शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी ठाकरेंना डिवचलं आहे. "आम्ही नक्कीच त्यांना मदत केली असती.." असं म्हणत राऊतांनी ठाकरेंना टोला लगावला आहे. राऊत एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. (mp sanjay raut taunt to mns raj thackeray)

राऊत म्हणाले, "अयोध्या दौरा रद्द करण्यामागे काय अडचणी आहेत ते माहित नाही. पण, भाजपने असे का करावे? भाजप प्रत्येकवेळी महाराष्ट्रातील नेत्यांना वापरून घेत आहे. त्यातलाच हा प्रकार दिसतोय. यातून काही लोकांना शहाणपण आले तर बरं होईल. आपण वापरले जातोय हे काही लोकांना उशिरा कळतं. कारण यात नुकसान महाराष्ट्राच्या नेतृत्वाचं होतंय," "राज ठाकरे यांना अयोध्या दौऱ्यासाठी मदत लागली असती तर आम्ही नक्कीच त्यांना मदत केली असती," असेही संजय राऊत म्हणाले.

"अयोध्येत इतर पक्षाचे काही कार्यक्रम होते. त्यांनी ते रद्द केले. त्यांना काही सहकार्य हवं असतं तर आम्ही नक्कीच मदत केली असती. शेवटी अयोध्या आहे. शिवसेनाला मानणारा वर्ग अयोध्येत आहे. उत्तर प्रदेशातील राजकारण्यांनी आणि इतरांनी शिवसेनेला नेहमीच सहकार्य केलं आहे. त्यांना आम्ही नक्कीच मदत केली असती," अशा शब्दात राऊतांनी त्यांना टोमणा लगावला.

'अयोध्या, वाराणासीत शिवसेनेचा मदत कक्ष आहे. आम्ही धार्मिक लोकं आहोत. कुणाला काही याबाबत अडचण असेल तर आम्ही त्यांना मदत करतो. आम्ही राजकारणाचा अभिनिवेश मागे ठेवतो.' अशा शेलक्या शब्दात संजय राऊत यांनी राज ठाकरेंचे नाव न घेता हल्लाबोल केला.

शिवसेना आणि अयोध्या यांचे नाते जुने आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होण्यापूर्वी तेथे गेले होते. त्यानंतर कोरोना काळामुळे अयोध्येला जाऊ शकलो नव्हतो. पण, कुणी दौरा रद्द केला असला तरी आदित्य ठाकरे आणि आम्ही १५ जूनला अयोध्येत जाणार आहोत, असे शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी स्पष्ट केलंय.

महाराष्ट्रात रामराज्य आणण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रयत्न करत आहेत. त्यासाठी आम्ही अयोध्येला जात आहोत. आम्ही काही तेथे शक्तिप्रदर्शन करण्यासाठी जात नाही तर रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी जात आहोत. आमची तयारी सुरु आहे, असेही त्यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT