पुणे : मनसेचे माथाडी कामगार सेनेचे शहराध्यक्ष निलेश माझीरे मनसेला (mns) सोडचिठ्ठी दिल्याचे वृत्त कालपासून माध्यमात फिरत आहे. मात्र, या वृत्ताचे खंडन निलेश माझीरे (Nilesh Majhire)यांनी केलं आहे. त्यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर करीत याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. (Nilesh Majhire News)
वसंत मोरे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळख असलेले माझीरे यांनी दोन दिवसापूर्वी शिवसेनेचे संपर्कनेते सचिन आहिर यांची भेट घेतली होती. त्यानंतर माझीरे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. याबाबत माझीरे म्हणतात,"माझ्या विरोधात हे कटकारस्थान आहे,"
काल रात्रीपासून काही न्यूज चॅनेलमध्ये मी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या बातम्या फिरु लागल्या आहेत.पण मी फेसबुकद्वारे सर्व महाराष्ट्र सैनिकांना सांगू इच्छितो की मी काही दिवसापूर्वी स्वारगेट येथील कबड्डी स्पर्धेमध्ये गेलो होतो त्या ठिकाणी शिवसेनेचे नेते सचिन आहिर आले होते.
त्यांना मी पुष्पगुच्छ दिला. त्याचा व्हिडिओ कालपासून व्हायरल होत आहे.पण माझं कुठेही असं स्टेटमेंट नाहीये की मी शिवसेनेत प्रवेश करतोय म्हणून. मी वसंत मोरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोडणार नाहीये, माझ्या विरोधात कटकारस्थान करणाऱ्यांना एवढच सांगतो मी मनसेतच आहे.विरोधकांनी जास्त लोड घेऊ नका.लवकरच लाइव्ह येणार आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा अयोध्या दौरा स्थगित करण्यात आला आहे. राज ठाकरे यांच्या अयोध्या (Ayodhya) दौऱ्यावरुन राजकारण चांगलंच तापायला लागले होते. राज ठाकरे येत्या पाच जूनला अयोद्धेला जाणार होते.काही कारणामुळे राज ठाकरे यांचा हा दौरा स्थगित करण्यात आला आहे. राज ठाकरे यांनी याबाबत टि्वट करून माहिती दिली आहे. मात्र, पुण्यातील सभा होणार असून मनसैनिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन राज यांनी ट्वीटमध्ये केले आहे. प्रकृतीच्या कारणामुळे 5 जूनला होणारा अयोध्या दौरा (Ayodhya Tour) पुढे ढकलला जाऊ शकतो, अशी चर्चा सुरू होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.