Shital Mhatre :  Sarkarnama
मुंबई

Sheetal Mhatre : 'त्या' व्हायरल व्हिडिओवर शीतल म्हात्रेंची पहिली प्रतिक्रिया ; "घरंदाज स्त्रीचा व्हिडीओ टाकणं वेदना देणारं.."

Sheetal Mhatre Reaction on Viral Video : ठाकरे गटावर संशय

सरकारनामा ब्युरो

Sheetal Mhatre Reaction on Viral Video : शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांचा एक व्हिडिओ कालपासून (शनिवारी) व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर यावरुन आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.

शीतल म्हात्रे यांनी याप्रकरणी दहिसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. हा व्हिडीओ मॉर्फ केला असल्याचा दावा शीतल म्हात्रे आणि प्रकाश सुर्वे यांनी केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एका रॅलीतील हा व्हिडिओ आहे. या रॅलीत आमदार प्रकाश सुर्वे आणि शीतल म्हात्रे या सहभागी झाल्या होत्या. म्हात्रे यांनी याप्रकरणी ठाकरे गटावर संशय व्यक्त केला आहे. याबाबत त्यांनी टि्वट करीत स्पष्टीकरण दिलं आहे.

याप्रकरणी, पोलिसांनी विनयभंग आणि इतर गुन्हे दाखल केले असून पुढील कारवाई करण्यात येत आहे. एका व्यक्तीला दहिसर पोलिसांनी अटक केली आहे. 'मातोश्री' या फेसबूक पेजवरून हा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला आहे.

"कोणीतरी इतक्या खालच्या पातळीवरचा विचार कसं करू शकतं? जी कोणाची तरी आई आहे, बहिण आहे, बायको आहे. अशा एका घरंदाज स्त्रीचा व्हिडीओ टाकणं स्त्री म्हणून मनाला वेदना देणारं आहेत. हे कोण आहे याची सर्वांना कल्पना आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात एखाद्या स्त्रीला अशापद्धतीने बदनमा केलं जातं. बहिण-भावाचं नातं असलेल्या एखाद्या स्त्रीला आणि पुरुषाला अशा पद्धतीने समाज विकृत नजरेने पाहतोय यामागे कोणाचं डोकं आहे हे संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय. त्यांच्याकडे काहीच करण्यासारखं नाहीय म्हणून ते एवढ्या पातळीपर्यंत आले आहेत,” अशी प्रतिक्रिया शीतल म्हात्रे यांनी दिली.

“राजकारणात मला अनुभव आले. पुरुषी विचार कसा असतो? एखादा पुरुष राजकारणात महिलांना कसा वागवतो? मी माझा आत्मसन्मान, मी माझं जीव, आणि करिअर पणाला लावलं. आज त्याच स्त्रीबद्दल बोलण्यासारखं काही नसतं. ती ज्या पद्धतीने काम करते ते कुठेतरी खटकत असतं. तिला अडकवण्यासाठी तिच्या चारित्र्यावर बोलणं अतिशय सोपं असतं," असे शीतल म्हात्रे यांनी म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT