Shiv Sena : 'मातोश्री' वरील शिवसेना महिला नेत्याचा तो Video Viral ; गुन्हा दाखल

Sheetal Mhatre video viral : पोलिसांनी एकाला अटक केली आहे. पोलिस इतरांचाही शोध घेत आहेत.
sheetal mhatre News, Shivsena Latest Marathi News
sheetal mhatre News, Shivsena Latest Marathi Newssarkarnama
Published on
Updated on

Sheetal Mhatre video viral : शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रे यांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. 'मातोश्री'नावाच्या फेसबूकपेजवरुन हा व्हिडोओ शेअर करण्यात आला होता. या व्हिडिओवरुन शिवसैनिक आक्रमक झाले आहेत.

शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी याप्रकरणी दहिसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. पोलिस इतरांचाही शोध घेत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रॅलीमधील हा व्हिडिओ आहे.

sheetal mhatre News, Shivsena Latest Marathi News
Congress : अधिवेशनात निलंबित झालेल्या रजनी पाटलांवर काँग्रेसने दिली मोठी जबाबदारी..

या रॅलीत आमदार प्रकाश सुर्वे आणि शीतल म्हात्रे सहभागी झाले होते. या दोघांचा व्हिडिओ मॉर्फ करुन तो व्हायरल करण्यात आला आहे. या व्हिडिओवर अश्लिल मजकूर टाकण्यात आला आहे. त्यामुळे दहिसरमध्ये शिवसैनिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

शीतल म्हात्रे यांनी मातोश्री नावाच्या पेजवर हा व्हिडिओ मॉर्फ करून घाणेरडा मजकूर लिहून व्हायरल केल्याचा आरोप केला आहे.

या मॉर्फ व्हिडीओची माहिती मिळाल्यानंतर आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वे हा मध्यरात्री कार्यकर्त्यांसह दहिसर पोलिस ठाण्यात पोहोचला होता. शिवसैनिकांनी येथेरात्रभर गोंधळ घातल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी तक्रार नोंदवून घेतली आहे.

sheetal mhatre News, Shivsena Latest Marathi News
Gulabrao Patil : "मंत्रिपदाचा सट्टा लावून शिंदेसोबत जाण्याचा निर्णय घेतला.."; ठाकरेंना यामुळे सोडलं ; गुलाबराव पाटलांनी..

या व्हिडिओबाबत शीतल म्हात्रे म्हणाल्या, "सोशल मीडियावरील मातोश्री नावाच्या अकांऊटमधून हा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला आहे. मातोश्री नावाच्या पेजवरुन महिलेची अशी बदनामी करणे, विरोधकांना शोभते का?, विरोधक एवढ्या खालच्या पातळीवर जातील, असे वाटले नव्हते,"

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com