Mumbai : मुंबई महानगरपालिकेवर येत्या 1 जुलैला शिवसेनेच्यावतीने (ठाकरे गट) भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाचे नेतृत्व ठाकरे गटाचे नेते अनिल परब आणि आमदार आदित्य ठाकरे करणार आहेत. या पार्श्वभूमीवरच आज आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत 1 जुलैला शिवसेनेच्यावतीने काढण्यात येणाऱ्या भव्य मोर्चाचे स्वरुप नेमकी कसं असणार? याबाबतची माहिती दिली.
याबरोबरच आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली. "मुंबईतील रस्त्याला खडी आणि सुशोभीकरणामध्ये कुणी घोटाळा केला?, शिंदे गट आणि भाजपने मुंबईत पाहणी करूनही पहिल्याच पावसात पाणी तुबंल, हा मुख्यमंत्र्यांचा नाकर्तेपणा आहे", अशा शब्दात आदित्य ठाकरेंनी राज्य सरकारवर टीका केली.
आदित्य ठाकरे म्हणाले, "पहिल्याच पावसात मुंबईत ठिकठिकाणी पाणी तुंबलं. या खोके सरकारने अनेक आश्वासनं दिली. मात्र, पूर्ण एकही केलं नाही. महाराष्ट्रात 100 टक्के खोके सरकार आहे. या सरकारने गेल्या एक वर्षात अनेक घोटाळे केले आहेत. मुंबईतील 50 रस्ते पूर्ण करण्याचे आश्वासन शिंदे-फडणवीस सरकारने दिले होते. पण यापैकी एकही रस्ताचे काम पूर्ण झाले नाही", असं यावेळी ते म्हणाले.
"पहिल्याच पावसात मुंबईत पाणी तुंबलं. त्यामुळे पहिल्याच पावसात सरकारचा नाकर्तेपणा यामधून दिसला. खरं तर हे सरकार नाले सफाईंच्या कामाच्या संदर्भात गंभीर नाही. या सरकारला फक्त कंत्राटदारांची काळजी आहे. हे सरकार म्हणजे स्वत:साठी खोके आणि जनतेसाठी धोके", असं हे सरकार आहे, अशी खरमरीत टीका यावेळी आदित्य ठाकरे यांनी केली.
मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा घेतला समाचार?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी "पाऊस आल्याचे स्वागत करा. मुंबईत पाणी तुंबलंय याची तक्रार काय करता", असं वक्तव्य केलं होतं. याबाबत बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, ते वक्तव्य मुख्यमंत्र्यांचे आहे. "पाऊस आल्याचे स्वागत करा. मुंबईत पाणी तुंबलंय याची तक्रार काय करता", हे वक्तव्य म्हणजे नाकर्तेपणाचे लक्षण आहे, अशी टीका करत आदित्य ठाकरे यांनी संताप व्यक्त केला.
मोर्चाचे स्वरुप नेमकी कसं असणार?
"मुंबई महानगरपालिकेवर येत्या 1 जुलैला शिवसेनेच्यावतीने भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा अनिल परब यांच्या नेतृत्वाखाली काढला जाणार आहे. मुंबईतील सांताक्रुजपासून भव्य मोर्चाची सुरवात होणार असून मुंबई महानगरपालिकेवर हा मोर्चा काढला जाणार आहे", अशी माहिती यावेळी आदित्य ठाकरे यांनी दिली.
Edited By : Ganesh Thombare
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.