Siddaramaiah News : कर्नाटक प्रमाणे शिंदे-फडणवीस सरकारलाही मुळासकट बाजूला करा! सिद्धरामय्यांचा सांगलीतून हल्लाबोल

Congress News : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपाला मुळासकट बाजूला केले.
Congress news
Congress newsSarkarnama
Published on
Updated on

Karnataka CM Siddaramaiah News : देशामध्ये आणि राज्यामध्ये भाजपा सत्तेत आहे. त्यांना सत्तेतून बाजूला करण्याची जबाबदारी आपली आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपाला मुळासकट बाजूला केले. लोकांनी काँग्रेसला कल दिला. कर्नाटकमध्ये 134 जागा मिळाल्या. 34 वर्षानंतर हा इतिहास घडला आहे. कर्नाटकमध्ये लोकांच्या आशिर्वादाने भाजपा कधीही निवडून आला नाही. कर्नाटक प्रमाणेच महाराष्ट्रातील सरकारही बाजूला करा, असे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या (Siddaramaiah) म्हणाले.

कर्नाटकचे मुख्ममंत्री सिद्धरामय्या यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र काँग्रेसच्या वतीने सांगलीमध्ये महा मेळाव्याचे आयोजन केले होते. या वेळी सिद्धरामय्या बोलत होते. यावेळी सिद्धरामय्या म्हणाले, देशाची लोकशाही आज धोक्यात आली आहे. भाजपा, जाती-धर्मा तणाव निर्माण करते. कर्नाटकमध्ये भाजपा ऑपरेशन कमळच्या माध्यमातून सत्तेत आले होते. आमदार-खरेदी विक्री करण्याचे काम भाजपाने (BJP) सुरु केले आहे, असा आरोप सिद्धरामय्या यांनी केला. कोट्यावधी रुपयाचे आमिष दाखवून लोकांना भाजपा फोडते. भाजप म्हणजेच भ्रष्टाचार, असेही सिद्धरामय्या यांनी म्हटले आहे.

Congress news
Sanjay Raut slams Shambhuraj Desai : बाळासाहेब देसाईंच्या नातवानं शेण खाल्लं ; राऊतांनी शंभूराज देसाईंना डिवचलं..

भाजपा सरकार कर्नाटकमध्ये ४० टक्के कमिशन घेत होते. महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकार भ्रष्ट आहे. आम्ही काँग्रेस जणांनी देशाला स्वातंत्र मिळवून दिले आहे. इंग्रजांना हाकलून दिलेले आम्ही आहोत. त्यामुळे देश वाचवण्याची आमची जबबादारी आहे. महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकार खाली खेचून पुन्हा काँग्रेसला सत्तेवर आले पाहिजे, असेही सिद्धरामय्या म्हणाले.

भाजपा सरकारकडे कोणतेही धोरण नाही. फक्त लाच घेणे हाच त्यांचा धंदा आहे. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार आणि मी संपूर्ण कर्नाटकमध्ये भाजपाचा भ्रष्टाचार घराघरा पर्यंत पोहचवला. काँग्रेसने (Congress) विधानसभा निवडणुकीमध्ये पाच योजनांची घोषणा केली होती. सरकार स्थापन झाल्यानंतर २४ तासात त्या पूर्ण केल्या, असेही सिद्धरामय्या यांनी सांगितले.

Congress news
Parbhani Loksabha News : परभणी लोकसभा शिंदेंची शिवसेनाच लढवणार, पहिल्यांदाच घेतली जाहीर भूमिका..

आम्ही सत्तेत आल्यानंतर प्रत्येक व्यक्तीला १० किलो तांदूळ मोफत देण्याची योजना आणली आहे. भाजपा सरकारने, कर्नाटक सरकारचा तांदूळ रोखला, अशी टीका सिद्धरामय्या यांनी केली. केंद्राकडून येणारा तांदूळ सरकारने थांबवला आहे. आम्ही काही फुटक तांदूळ मागीतला नव्हता. आम्ही त्यांचे पैसे देणार होतो. मात्र, ते त्यामध्ये राजकारण करत आहेत. मी स्वत: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटलो. तरीही कर्नाटकला तादूळ मिळाला नाही.

यावरुन स्पष्ट दिसते की केंद्रातील भाजप सरकार हे गोरगरीबांवर अन्याय करते. महाराष्ट्रात काँग्रेसचे सरकार आणले पाहिजे. लोकांनी काँग्रेसला सत्तेत आणले. ज्या-ज्या ठिकाणी नरेंद्र मोदी यांनी सभा घेतल्या आणि रॅली केल्या त्या ठिकाणी भाजप हारले, असा हल्लाबोल सिद्धरामय्या यांनी केला.

Congress news
Bhagirath Bhalke Will Join BRS : सोलापुरात राष्ट्रवादीला मोठा धक्का; भगीरथ भालके २७ जूनला BRSमध्ये प्रवेश करणार

अच्छेदिन येणार म्हणून सांगितेल होते. मात्र, ते आले का? गॅस, पेट्रोल, डिझेलचे दर मोठ्या प्रमाणात वाढवले आहेत. मनमोहन सिंग यांच्या काळामध्ये ४१५ रुपयांना गॅस मिळत होता. आता त्या गॅसचा भाव काय झाला आहे? देशाचा विकास करायचा असले तर भाजप सरकारमध्ये राहता कामा नये. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे सरकार आणने ही सर्वांची जबाबदारी आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या पाणी प्रश्नावर चर्चा करुन सकात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासही यावेळी सिद्धरामय्या यांनी दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com