Rahul Narvekar, Uddhav Thackeray Sarkarnama
मुंबई

Shiv Sena MLA Disqualificaiton case : नार्वेकरांच्या निकालानंतर ठाकरेंची जळजळीत प्रतिक्रिया; म्हणाले,'स्वतः दोन-तीन पक्ष बदलणाऱ्या...'

Avinash Chandane

Mumbai Political News :

खरी शिवसेना (Shiv Sena) एकनाथ शिंदे यांचीच (Eknath Shinde) आहे, या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांच्या निकालावर उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. पक्षांतर बंदी कायदा बाजूलाच राहिला, नार्वेकरांनी पक्षांतरचा राजमार्ग दाखवला आहे, अशी जळजळीत प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

विधानसभा अध्यक्षांनी आरोपीची भेट घेतली तेव्हाच निकाल समजला होता, अशी संतप्त प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिली आहे. शिवाय मूळ प्रकरण अपात्रतेच असताना विधानसभा अध्यक्षांनी कुणालाही अपात्र ठरवले नाही. एकूण या निकालावर 'ते गद्दारच आहेत', अशी आज प्रतिक्रिया दिली.

राहुल नार्वेकर यांनी दिलेला निकाल म्हणजे लोकशाहीचा खून आहे. हा निकाल म्हणजे निर्लज्जपणाचा कळस असल्याची, अत्यंत तिखट प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिली. नार्वेकरांचा निकाला मानावा की सुप्रीम कोर्टाचा, असा सवाल करत नार्वेकरांनी सुप्रीम कोर्टाला जुमानत नसल्याचे दाखवून दिले आहे. त्यांनी सुप्रीम कोर्टाचा अपमान केला असून कोर्टाने त्यांच्यावर सुमोटो कारवाई करावी, असे आवाहन त्यांनी केले.ॉ

आता या निकालाविरोधात आम्ही पुन्हा कोर्टात जाणार आहोत. शिवाय निवडणुकीच्या आधी निकाला लागावी म्हणजे दूध का दूध आणि पानी का पानी स्पष्ट होईल, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. त्यांना शिवसेना संपवायची आहे, पण त्यांना ते कधीही शक्य होणार नाही, असे उद्धव ठाकरेंनी ठणकावून सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पक्षांतरबंदी कायदा अधिक मजबूत करण्यापेक्षा त्यांना पक्षांतराचा राजमार्ग कसा असायला हवा, हे नार्वेकर यांनी आज दाखवून दिले आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. त्याचवेळी नार्वेकरांनी स्वत: दोन-तीन वेळा पक्ष बदलल्याने त्यांचा मार्ग त्यांनी मोकळा केल्याचा टोलाही त्यांनी नार्वेकरांना लगावला.

आतापर्यंत सुप्रीम कोर्टाचे निकाल प्रमाण मानले जातात. परंतु, आमदार अपात्रता प्रकरणात सुप्रीम कोर्टाचे निकाल धाब्यावर बसवले गेले आहेत, असा घणाघात उद्धव ठाकरेंनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांवर केला. देशाची लोकशाही पायदळी तुडवली आहेच आता सुप्रीम कोर्टाचेही अस्तित्वही शिल्लक राहणार आहे का, हे त्यांनी ठरवायचे आहे. म्हणूनच सुप्रीम कोर्टाने नार्वेकरांविरोधात सुमोटो दाखल करावी, असे आवाहन ठाकरेंनी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT