Shiv Sena MLA Disqualification  Sarkarnama
मुंबई

Shiv Sena MLA Disqualification : ठाकरे-शिंदेंसाठी ऑक्टोबरमधील दोन मंगळवार ठरणार महत्त्वाचे! नार्वेकर म्हणाले, 'अपात्रतेसंदर्भात नियम सतत ...'

Rahul Narwekar On Shiv Sena : नार्वेकरांनी यावर भाष्य करीत अनेक प्रश्नांची उत्तरे दिली आहेत.

Mangesh Mahale

Mumbai : संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या शिवसेनेतील सोळा आमदारांच्या अपात्रतेबाबत लवकरच अंतिम निकाल येण्याची शक्यता आहे.सर्वोच्च न्यायालयाने अपात्रतेच्या निर्णयाबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून होणाऱ्या दिरंगाईबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. एका आठवड्यात सुनावणी घेण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आता माध्यमांशी बोलताना नार्वेकरांनी यावर भाष्य करीत अनेक प्रश्नांची उत्तरे दिली आहेत.

दोन्ही सुनावण्या मंगळवारीच

शिवसेना आमदारांच्या अपात्रतेबाबत ऑक्टोबर महिना महत्त्वपूर्ण ठरणार आहे. कारण तीन आणि दहा तारखेला दोन मोठ्या याचिकेवर सुनावणी सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील न्यायाधीश जे. बी. पारडीवाला, न्यायाधीश मनोज मिश्रा यांच्या खंडपीठापुढे सुनावणी होत आहे. तीन ऑक्टोबर रोजी आमदार अपात्रता (ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू विरुद्ध विधानसभा अध्यक्ष) तर दहा तारखेला पक्षाचे नाव आणि चिन्ह (उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे) याचिकेवर सुनावणी होणार आहे. दोन्ही सुनावण्या मंगळवारीच होणार आहेत.

हे प्रकरण अनिश्चित काळापर्यंत चालू ठेवता येणार नाही...

आमदारांच्या अपात्रता प्रकरणावर नार्वेकरांनी कारवाई सुरू केली, परंतु त्यात दिरंगाई होत असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून सातत्याने केला जात होता. त्यातच ठाकरे गटाकडून विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने एका आठवड्यात कशा पद्धतीने अध्यक्ष कार्यवाही करणार आहेत याचं वेळापत्रक सादर करण्यास सांगितलं. त्याचबरोबर ही हे प्रकरण अनिश्चित काळापर्यंत चालू ठेवता येणार नाही, असं देखील न्यायालयाने म्हटलं आहे.

अपात्रतेसंदर्भात नियम सतत बदलत..

नार्वेकर काल (गुरुवारी) दिल्लीला गेले होते. त्यावर त्यांनी खुलासा केला आहे. दिल्लीचा दौरा हा पूर्वनियोजित होता.या दौऱ्यादरम्यान कायदेतज्ज्ञांची भेट घेतल्याचंही नार्वेकरांनी सांगितलं. कायदेतज्ज्ञांना भेटून चर्चा केल्याचं त्यांनी म्हटलं आहे. अपात्रतेसंदर्भात ज्या काही याचिका आल्या आहेत, त्या याचिकांवर चर्चा झाली.अपात्रतेसंदर्भात कसे नियम लागू होतात,याची माहिती घेतली. अपात्रतेसंदर्भात नियम सतत बदलत असतात. परिस्थितीनुसार या नियमांमध्ये बदल होतो, असे ते म्हणाले. शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय नार्वेकरांना लवकरच घ्यावा लागणार आहे. त्यांच्या निर्णयाकडे देशाचे लक्ष लागले आहे.

Edited By : Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT