Women Reservation News : मोदींचा मास्टरस्ट्रोक; विरोधकांना धक्का देत `वन नेशन, वन इलेक्शन`ऐवजी पास केले महिला आरक्षण बिल

Narendra Modi News : एका दगडात मोदींनी अनेक पक्षी मारले.
Narendra Modi
Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

Pimpri : एक दिवस अगोदरच गुरुवारी (ता. २१) संसदेचे खास अधिवेशन गुंडाळण्यात आले. त्याचा अजेंडा जाहीर न करता `वन नेशन, वन इलेक्शन`वर ते असेल,अशी पुडी सोडून देण्यात आली होती. मात्र, नेहमीसारखा चकवा देत आपल्या धक्कातंत्राने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या अधिवेशनात एक देश, एक निवडणूकऐवजी महिला मतांची बेगमी करणारे महिला आरक्षण विधेयक संमत करून विरोधकांना जोरदार धक्का दिला.

बहुमताने हे बिल पास करून घेऊन एका दगडात मोदींनी अनेक पक्षी मारले. महिला आरक्षण दिल्याचे श्रेय त्यांनी व भाजपने घेतले. विरोधकांना तोंडघशीही पाडले. कारण विरोधकांनी भलत्याच विषयावर हे अधिवेशन होणार असल्याचे सांगत त्याला जोरदार विरोध करणार असल्याचे सूतोवाच केले होते. पण, महिला आरक्षण विधेयकाचा डाव टाकून मोदींनी त्यांची ही खेळी त्यांच्यावरच उलटवली. एवढेच नाही, तर त्यांना महिला आरक्षण विधेयक या आपल्या खेळीला मूकपणे बहुमताने संमती देण्यास भागही पाडले.

Narendra Modi
Dhangar Samaj Aarakshan: सुरेश बंडगर उपोषणावर ठाम; म्हणाले,'पत्नीचं कुंकू पुसून आलोय... प्राण गेले तरी चालेल'

जनगणना आणि त्यानुसार होणाऱ्या मतदारसंघ पुनर्रचनेनंतरच महिला आरक्षण हे लोकसभा आणि विधानसभेत लागू होणार असल्याने त्यासाठी २०२९ पर्यंत वाट पाहावी लागणार आहे. पण, जणू काही ते आताच लागू होणार आहे, अशा थाटात मोदींनी त्याचे श्रेय घेतले. त्याचा फायदा २०२४ च्या आगामी लोकसभा निवडणुकीला निश्चित होईल, असा त्यांचा होरा आहे.

आपली लाट तथा करिष्मा ओसरल्याचे लक्षात आल्याने मोदींनी हा डाव टाकला आहे. असे आणखी काही धक्कादायक निर्णय ते येत्या काही दिवसांत घेतील, असा अंदाज आहे. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी अगोदरच केंद्रात सत्तेची हॅटट्रिक करण्यासाठी विभिन्न विचारधारेच्या अजित पवारांना आपल्याकडे वळविलेही आहे.

दरम्यान, एक देश, एक निवडणूक या विषयावर चर्चा घडवून ते विधेयक मोदी पास करतील आणि मे २०२४ ला होणारी लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक ही यावर्षी डिसेंबरमध्ये मुदतपूर्व घेतील, असा विरोधकांचा संसदेचे खास अधिवेशनमागील तर्क होता.

त्यामुळे त्यांनी त्याला विरोध करण्याची जोरदार तयारी केली होती. तसेच मुदतपूर्व निवडणूक होईल, या शक्यतेतून विरोधकांच्या इंडिया आघाडीने बैठकांचा सपाटाही लाव सुरू केला होता. पण, त्यांनी धसका घेतलेल्या या अधिवेशनात त्यांना अपेक्षित घडलेच नाही. उलट अनपेक्षित अशा महिला आरक्षणाच्या मोदींच्या खेळीला त्यांना साथ द्यावी लागली. त्यांना धक्का बसला. मोदींनी त्यांना चकवाच नाही, तर पुन्हा एकदा आपले धक्कातंत्र दाखवून दिले. पुन्हा एकदा विरोधकांनाच कामाला लावले.

Edited By : Mangesh Mahale

Narendra Modi
NCP Split News : राष्ट्रवादीच्या पाच आमदारांच्या अपात्रतेबाबतची कार्यवाही लवकरच? नीलम गोऱ्हेंकडून पुढील आठवड्यात...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com