Uddhav Thackeray Vs Eknath Shinde Sarkarnama
मुंबई

Shiv Sena : आमदार अपात्रता सुनावणी आजपासून फास्ट ट्रॅकवर; वेळापत्रकात मोठा बदल

Rahul Narvekar : सर्वोच्च न्यायालयाने ३१ डिसेंबरपर्यंत या प्रकरणाचा निकाल लावण्याचे आदेश दिले आहेत.

Rajanand More

Disqualification Case : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणीच्या वेळापत्रकात विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मोठा बदल केला आहे. ही सुनावणी आजपासून फास्टट्रॅकवर घेतली जाणार आहे. शनिवार-रविवारीही सलग सुनावणी होणार असल्याने लवकर निकाल लागण्याची शक्यता वाढली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) ३१ डिसेंबरपर्यंत या प्रकरणाचा निकाल लावण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना त्यानुसार वेळापत्रक सादर करण्याच्या सुचना दिल्या होत्या. अध्यक्षांकडे सध्या सुनावणी सुरू असून अधिवेशनामुळे त्याला विलंब होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. पण नार्वेकर यांनी अधिवेशन काळातही सुनावणीला विलंब होणार नाही, यादृष्टीने वेळापत्रक तयार केले आहे.

सुनावणीच्या वेळापत्रकात मोठा बदल करण्यात आला आहे. त्याची सुरुवात आजपासूनच झाली. उलट साक्ष घेण्यासाठी ठाकरे गटास आणखी एका दिवसाची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार रविवारीही सुनावणी होणार आहे. ११ ते २० डिसेंबर या कालावधीत सलग सुनावणी चालणार आहे. त्यामुळे सुनावणीचा निकाल लवकर लागण्याची शक्यता आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सुधारित वेळापत्रकानुसार ८ व ९ डिसेंबरव आणि ११ व १२ डिसेंबर असे चार दिवस ठाकरे गटाकडून शिंदे गटाच्या साक्षीदारांची उलट साक्ष घेतली जाणार आहे. दोन्ही गटांना १३ ते १५ डिसेंबर या काळात लेखी म्हणणे सादर करण्यास सांगण्यात आले आहे. त्याआधारे १६ ते २० डिसेंबर असे सलग पाच दिवस अंतिम सुनावणी होईल. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांकडून ३१ डिसेंबरपुर्वीच या प्रकरणाचा निकाल लावण्याची तयारी सुरू असल्याची चर्चा आहे.

आज सकाळीच सुनावणी सुरू

शुक्रवारी सकाळी साडे आठ वाजता सुनावणीला सुरूवात होणार होती. पण शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे यांची सुनावणी होणार होती. पण ते २० मिनिटे उशिरा आले. त्यानंतर सुनावणी सुरू झाल्यानंतर ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामतांनी साक्ष उलटतपासणीला सुरूवात केली. दुपारच्या सत्रात आमदार योगेश कदम यांची उलटतपासणी होणार आहे.

(Edited By - Rajanand More)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT