Sangali: "मराठा समाजाला कुणबी मधून आरक्षण पाहिजे असल्यास त्यांनी लंगोट घालून फिरायाची तयारी ठेवावी," असा टोला ओबीसी नेते, माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी लगावला.
आजही कोकणात कुणबी हे लंगोट घालून फिरतात, मराठा समाजाची मागणी पाहिली तर त्यांना कुणबी मधून प्रमाणपत्र हवे आहे. त्यांनी अगोदर लंगोट घालून फिरावे, ते वस्तारा घेऊन फिरणार का? असे आवाहन शेंडगें यांनी करीत पुन्हा एकदा मराठा समाजाला डिवचलं आहे.
मराठा आरक्षणावरून प्रकाश शेंडगे यांनी सरकारला इशारा दिला आहे. सध्या सुरू असणाऱ्या अधिवेशनात जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घ्यावा, ओबीसी समाजाला मराठा समाजाप्रमाणे निधी मंजूर करावा, असे आवाहन शेंडगे यानी केले आहे. याचबरोबर छगन भुजबळांना आम्ही पाडू म्हणाऱ्यांना शेंडगे यांनी आव्हान देत "तुम्ही आमचा एक आमदार पाडाल तर तुमचे 160 पाडू" असा इशाराही दिला. ते सांगलीत बोलत होते.
मागासवर्ग आयोगात सुरू असणाऱ्या राजीनामा नाट्यावर नाराजी व्यक्त करीत शेंडगे यांनी याला मंत्री चंद्रकांत पाटील हेच जबाबदार असल्याचे सांगितले. चंद्रकांत पाटील यांनी आयोगात हस्तक्षेप करणे योग्य नाही. घटनामत्मक दर्जा असणाऱ्या आयोगात चंद्रकांत दादांचा हस्तक्षेप चुकीचा असल्याचा आरोपही शेंडगे यांनी केला आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मराठा आरक्षणासाठी लढा पुकारलेले मनोज जरांगे पाटील यांची उमरगा शहरात रविवारी (ता.१०) रात्री छत्रपती शिवाजी महाराज महाविद्यालयाच्या शिवाजी दाजी मोरे क्रिडा संकुलाच्या मैदानावर होणाऱ्या आरक्षण जनजागृती सभेची जय्यत तयारी सुरू आहे. जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यासाठी लढा उभा केला आहे, त्यांच्या समर्थनार्थ उमरगा येथील मराठा बांधवांनी आंदोलन, उपोषण केलेले आहे. आता आरक्षणाचा लढा अंतिम टप्यात आला आहे, कसल्याही परिस्थितीत आरक्षण मिळवून घेण्यासाठी व्यापक जनजागृती सुरू आहे, त्या अनुषंगाने उमरग्यात विराट सभेचे नियोजन करण्यात आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.