Thane News Sarkarnama
मुंबई

Shiv Sena MLA Disqualification : नार्वेकरांच्या निकालानंतर ठाण्यात आता फक्त बॅनर बोलणार

Rahul Narvekar : शिवसेना शिंदे गटाचीच असल्याचा निकाल राहुल नार्वेकरांनी काल दिला आहे.

सरकारनामा ब्यूरो

पंकज रोडेकर

Thane News : शिवसेना कुणाची या निकालाच्या निर्णयावरून महाविकास आघाडीतील घटक पक्षांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत असताना, आता ठाण्यात महाविकास आघाडीचे बॅनर झळकले आहे. त्या बॅनरवर जळजळीत प्रतिक्रियेसह अब न्याय जनता करेगी... असे नमूद केले आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे गट किंवा महायुती बॅनरद्वारे उत्तर देण्याची शक्यता आहे. यावरून ठाण्यात आता बॅनर बोलणार असल्याचे दिसत आहे.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी बुधवारी शिवसेना (Shiv Sena) आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल दिला. त्यानंतर शिवसेनेच्या दोन्ही गटाकडून प्रतिक्रिया उमटल्या. एकीकडे जल्लोष दुसरीकडे निषेध असे चित्र पाहण्यास मिळाले. दरम्यान, दोन गटाच्या मित्रपक्षांनी आपापली भूमिका मांडली. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बुधवारी रात्री विमानतळावर आल्यावर त्यांचे दणक्यात स्वागत करण्यात आले.

ठाणे आणि बॅनरबाजी ही गोष्ट काही नवीन नाही. नवीन वर्षाच्या शुभेच्छा... ही महाविकास आघाडीने ठाणेकरांना देताना, मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांना त्यांच्या ठाण्यातील निवासस्थानच्या जवळील नाक्यावर लावत डिवचण्याचा प्रयत्न केला होता. त्याआधीही शिवसेना शिंदे गट आणि आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यात बॅनर बाजी पाहण्यास मिळाली होती. त्यातच शिवसेना कुणाची या निकालानंतर ठाणे शहरात महाविकास आघाडीने आता बॅनर लावले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बॅनरवर अब न्याय जनता करेगी... असे म्हटले आहे. तसेच त्या बॅनरवर फक्त महाविकास आघाडीच म्हटले आहे. अन्य कोणाचे नाव किंवा फोटो सुद्धा दिसत नाही. त्यामुळे आता शिवसेना शिंदे गट किंवा महायुती त्या बॅनरला काय उत्तर देते याकडे राजकीय मंडळींसह ठाणेकर नागरिकांचे लक्ष लागले आहे. बहुदा आता ठाण्यात फक्त बॅनरच बोलणार की काय असे दिसत आहे.

बॅनरवर काय लिहिलं आहे...

आज दिवसाढवळ्या महाराष्ट्रात लोकशाहीची हत्या झाली,

अन् लोकांनी ती उघड्या डोळ्यांनी बघितली!

अब न्याय जनता करेगी...

महाविकास आघाडी

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT