Shiv Sena MLA Disqualification verdict : माजी शिलेदाराचे ठाकरेंवर तोंडसुख; म्हणाले, वारशाने पक्ष...

MLA Mahesh Kale critizied on Uddhav Thackeray : घटनेप्रमाणे हुकूमशाहीविरोधात दिलेला निकाल, शिंदेंच्या आमदारांकडून नार्वेकरांचे कौतुक
Uddhav Thackeray, Rahul Narwekar, Mahesh Shinde
Uddhav Thackeray, Rahul Narwekar, Mahesh ShindeSarkarnama
Published on
Updated on

Satara Political News :

शिवसेना आमदार अपात्रता निकालानंतर राज्यातून विविध प्रतिक्रिया येत आहेत. कुणी विधानसभा अध्यक्षांवर टीकेची झोड उठवत आहे तर कुणी एकनाथ शिंदे यांचे (Eknath Shinde) अभिनंदन करत आहे. अशातच कोरेगावचे शिवसेना (शिंदे गट) आमदार महेश शिंदे (Mahesh Shinde) यांनी नार्वेकर आणि उद्धव ठाकरेंबाबत (Uddhav Thackeray) महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.

आमदार महेश शिंदे यांनी थेट उद्धव ठाकरेंवर तोंडसुख घेतले आहे. वारसा हक्काने पक्षप्रमुखपद मिळते पण वारसा हक्काने पक्ष चालवता येत नाही, शब्दांत महेश शिंदे यांनी ठाकरेंना लक्ष्य केले आहे. त्याचवेळी त्यांनी विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांचे (Rahul Narwekar) आभार देखील मानले आहेत.

Uddhav Thackeray, Rahul Narwekar, Mahesh Shinde
Sanjay Raut : ...मग श्रीकांत शिंदे तुमचे पुत्र नाहीत का?

आमदार अपात्रतेचा (Shiv Sena MLA Disqualification verdict) लागलेला निकाल म्हणजे हुकुमशाहीच्या विरोधात लोकशाहीचा झालेला विजय आहे. ज्या पक्षांमध्ये लोकशाहीची प्रक्रिया राबवली जात नाही, त्या लोकांना भारताच्या लोकशाहीवर बोलायचा अधिकार नाही, अशी खरपूस टीका महेश शिंदे यांनी ठाकरेंवर केली आहे.

अध्यक्षांनी दिलेला निकाल हा निवडणूक आयोगाकडे जी पक्षाची घटना आहे. त्या घटनेच्या आधारावर दिला गेलेला निकाल आहे, असे सांगतानाच महेश शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना डिवचले आहे. पक्ष हा कार्यकर्त्यांच्या मतांच्या जीवावरती त्यांच्या विचारांच्या जीवावरती चालवला जातो. अशा प्रकारचा सुंदर निकाल विधानसभा अध्यक्षांनी दिला आहे, अशी पुस्तीही आमदार शिंदे यांनी जोडली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शिवसेनेत हुकूमशाही सुरू होती. ते लोकशाही मानत नव्हते. आमचे आमदार वारंवार सांगत होते, आम्ही कोणत्याही घटनेची पायमल्ली केलेली नाही किंवा चुकीची कृती केलेली नाही.  2013, 2018 मध्ये ज्या काही निवडणुका झाल्या त्या केवळ पेपरवरती दाखवण्यात आल्या.

पक्षाचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांना 2018 साली मत दिले का, यावर मला आठवत नाही, असे उत्तर दिले होते. याचाच अर्थ त्यांनी मतदान केलं नव्हते, केवळ नंतर प्रतिज्ञापत्र दाखल करून बिनविरोध झाल्याचे सांगितले. तेव्हा ज्या लोकांनी लोकशाहीची प्रक्रिया राबवली नाही. त्या लोकांना भारताच्या लोकशाहीवर बोलण्याचा अधिकार नाही, असे सडेतोड उत्तर आमदार महेश शिंदे यांनी दिले आहे. 

Uddhav Thackeray, Rahul Narwekar, Mahesh Shinde
Shiv Sena MLA Disqualification case : निकालाने वाढवली ठाकरेंची ताकद; पाठीशी विरोधकांच्या एकीचे बळ

आमच्या हकालपट्टीचे अधिकार नाहीत

विधानसभा अध्यक्षांनी शिंदे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन गटांतील खरी शिवसेना कोण याचा निकाल दिला आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाकडे असलेल्या घटनेचा आधार घेतला आहे. जो न्यायालयात टिकला. जर आम्ही खऱ्या शिवसेनेचे आहोत तर आम्हाला पक्षातून हाकलून देण्याचा त्यांना अधिकार नाही. म्हणूनच वारशाने पक्षप्रमुख होता येत पण वारशाने पक्ष चालवता येत नाही, अशी खोचक टीका करत आमदार महेश शिंदेंनी ठाकरेंना डिवचले आहे.

(Edited by Avinash Chandane)

Uddhav Thackeray, Rahul Narwekar, Mahesh Shinde
Shiv Sena MLA Disqualification Case : शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणी मोठा गौप्यस्फोट; ‘एकही आमदार अपात्र होणार नाही...’

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com