Navneet Rana, MLA Manisha Kayande
Navneet Rana, MLA Manisha Kayande sarkarnama
मुंबई

'राणा दांपत्यांनी सरकारी चहाशी तरी इमान राखायचे!'

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : 'मातोश्री' विरोधात पंगा घेणाऱ्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. त्याआधी पोलीस ठाण्यात आपण मागासवर्गीय असल्याने आपल्याला पोलिसांनी पाणी दिले नाही, असा गंभीर आरोप नवनीत राणा यांनी केला होता. त्यानंतर मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे (Sanjay Pandey) यांनी राणा यांचा एक व्हिडीओ ट्विट केला होता. त्यावरुन शिवसेनेच्या आमदार मनिषा कांयदे (MLA Manisha Kayande) यांनी नवनीत राणा यांच्यावर निशाणा साधला आहे.

या संदर्भात मनिषा कायंदे यांनी ट्वीट केले आहे. आपल्या ट्वीटमध्ये मनिषा कायंदे म्हणाल्या, ''नवनीत राणा, हे राजकारण आहे, सी ग्रेड चित्रपट नाही, याचे भान राखा. दुसऱ्याने लिहून दिलेले स्क्रिप्ट वाचून नाटक करणे हे तुमच्या चित्रपटात ठीक होते, आता भानावर या, अन्यथा शिवसेनेच्या रणरागिणी तुम्हाला ताळ्यावर आणतील'' असा इशारा दिला आहे. ''लाज वाटायला हवी नवनीत राणा यांना. मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र सरकारची बदनामी करतांना सरकारी चहाशी तरी इमान राखायचे. अर्थात तुमच्याकडून कसली अपेक्षा करावी?'' असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

दरम्यान, संजय पांडे यांनी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास एक व्हिडीओ ट्विट करत राणा यांचे आरोप खोटे असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. हा व्हिडीओ खार पोलीस ठाण्यात असल्याचे सांगितले जात आहे. 'आम्हाला आणखी काय बोलण्याची गरज आहे का,' असंही पांडे यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे. पांडे यांनी यापेक्षा काहीही न लिहिता व्हिडीओतून पोलीसांनी कोणतीही चूक केली नसल्याचेच सांगण्याचा प्रयत्न केला आहे. थेट संजय पांडे यांनीच हा व्हिडीओ ट्विट केल्याने त्याला महत्व प्राप्त झाले. पांडे यांनी ट्विट केलेल्या व्हिडीओमध्ये राणा दाम्पत्य अत्यंत शांत वातावरणामध्ये चहा पित असल्याचे दिसत आहे.

मुंबई पोलिस जातीयवादी असल्याचा आरोप राणा यांनी केला होता. त्याची लेखी तक्रार त्यांनी लोकसभा अध्यक्षांकडे केली होती. या संबंधी त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला (Omprakash Birla) यांना एक पत्र लिहिले होते. त्या पत्राची दखल घेत या संदर्भातील अहवाल २४ तासात सादर करण्याचे आदेश लोकसभा सचिवांनी दिले होते. त्यानुसार आता गृह खात्याचा आहवाल लोकसभा सचिवांना पाठवण्यात येणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT