Shivsena-MNS Alliance: मुंबईसह उर्वरित महाराष्ट्रातील सर्वच महापालिका निवडणुकांची घोषणा झाली आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याला देखील सुरुवात झाली आहे. त्यामुळं आता महापालिकांतील राजकारणाला वेगळी दिशा देणारी घडामोड घडणार आहे. त्याच कारण म्हणजे ठाकरे बंधू! शिवसेना नेते उद्धव ठाकरे आणि मनसे नेते राज ठाकरे यांची बहुचर्चित युती लवकरच जाहीर होणार आहे. याची तारीख आणि ठिकाणही निश्चित झालं असून शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी यासंदर्भत माहिती दिली आहे.
संजय राऊत यांनी ट्विटद्वारे सूचकरित्या ही माहिती दिली आहे. ते म्हणतात, "उद्या १२ वाजता 'हॉटेल ब्लू सी' वरळी" या माहितीसह राऊत यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा एकत्रित फोटोही शेअर केला आहे. यावरुन या ठाकरे बंधुंच्या पक्षांच्या युतीची घोषणा होणार असल्याचं प्रतित होतं. त्यामुळं उद्या, बुधवार २४ डिसेंबर २०२५ रोजी, वरळीलीतील हॉटेल ब्लू सी या ठिकाणी शिवेसना आणि मनसे या दोन्ही पक्षांच्या युतीची घोषणा होणार असल्याचं आता निश्चित झालं आहे.
दरम्यान, मुंबई महापालिका जिंकणं हा ठाकरेंसाठी अत्यंत प्रतिष्ठेचा विषय असणार आहे. कारण गेल्या २५ वर्षांपासून शिवसेनेची इथं सत्ता आहे ती कायम राखणं ठाकरेंसमोरील आव्हान असणार आहे. पण शिवसेनेत फूट पडल्यामुळं ठाकरेंची शिवसेना सध्या दुबळी झाली आहे. तसंच दुसरीकडं एकनाथ शिंदे हे आपल्या शिलेदारांसह भाजपच्या साथीनं मुंबई जिंकण्यासाठी जीवाचं रान करणार आहेत. त्यामुळं या आव्हानात्मक परिस्थितीत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना मतदीचा हात दिला आहे. शाळांमध्ये मराठी सक्तीच्या मुद्द्यावरुन एकत्र आलेले ठाकरे बंधू हे आता मुंबई महापालिका जिंकण्यासाठी एकत्रितपणे जोरदार प्रयत्न करतील. मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरच ठाकरे बंधुंना मुंबई महापालिका निवडणूक लढवावी लागणार आहे. कारण प्रादेशिक आस्मिता हाच या दोन्ही पक्षांचा पाया आहे.
पण उद्या ठाकरेंच्या युतीची घोषणा झाल्यानंतर जागा वाटप आणि उमेदवारांची घोषणा आणि प्रचाराचा झंझावात सुरु झाल्यानंतर खऱ्या अर्थानं कोणाचं पारडं जड राहिलं हे सांगता येईल. ठाकरे बंधुंच्या एकत्र येण्यानं महायुतीला काहीही फरक पडणार नाही, असं जरी भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेचे नेते सांगत असले तरी ठाकरेंचा करिष्मा अद्याप कायम असल्यानं त्यांच्या युतीचं आव्हान हे महायुतीसमोर असणारच आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.