Shiv Sena MP Sanjay Raut Latest Marathi News
Shiv Sena MP Sanjay Raut Latest Marathi News Sarkarnama
मुंबई

भाजपमधील तुमच्या मातोश्री-पिताश्रींना विचारा! राऊतांनी मनसेला डिवचलं

सरकारनामा ब्युरो

मुंबई : औरंगाबादच्या नामांतरावरून शिवसेना व महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत. औरंगाबादचे संभाजीनगर असं नामांतर कधी होणार, असा सवाल मनसेकडून उपस्थित केला जात आहे. त्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मनसेला डिवचलं आहे. (Shiv Sena MP Sanjay Raut Latest Marathi News)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील सभेत औरंगाबादच्या नामकरणावरून केलेल्या वक्तव्यानंतर भाजपसह मनसेकडून (MNS) सातत्याने टीका केली जात आहे. भाजपनेही आपण सत्तेत आल्यानंतरच संभाजीनगर असं नामांतर करू, असं म्हटलं आहे. मनसेकडूनही सातत्याने नामांतराचा मुद्दा उचलून धरत टीका निशाणा साधला जात आहे.

राऊतांनी मंगळवारी खोचक शब्दांत मनसेला टोला लगावला. मनसेने यासंदर्भात त्यांचे भाजपमधील मातोश्री-पिताश्री यांना हा प्रश्न विचारावा. केंद्रामध्ये त्यांचं सरकार आहे. राज्याकडून हा प्रस्ताव गेलेला आहे, असं स्पष्ट करत राऊतांनी मनसेला उत्तर दिलं.

सभा ऐतिहासिक होणार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी औरंगाबाद येथील सभा ऐतिहासिक ठरेल, असं राऊत म्हणाले आहेत. मराठवाड्यातल्या शिवसैनिकांना नेत्यांनी ही सभा ऐतिहासिक व्हावी यासाठी खूप कष्ट घेतले आहेत, असं त्यांनी सांगितले. तसेच अयोध्येतही आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याची जय्यत तयारी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. अजूनही आमचे पन्नास लोक काम करत आहेत. त्यादिवशी संध्याकाळी महाआरतीचा कार्यक्रम आहे. शरयू तीरावर होणाऱ्या या कार्यक्रमाकडे फार लक्ष दिले जात असल्याचे राऊतांनी स्पष्ट केलं.

तुमचं ते गेट-टूगेदर आणि आमचं...

भाजपवर टीका करताना राऊत म्हणाले, सगळ्याच पक्षाचे नेते अशा निवडणुकांना एकत्र येत असतात. आमदारांना मतदान संदर्भात काही सूचना द्यायच्या असतात. विधानपरिषद आणि राज्यसभेच्या निवडणुकांच्या काही प्रक्रिया खूप तांत्रिक असतात त्या संदर्भात आमदारांना थोडं मार्गदर्शन करायचं असतं.

अशाप्रकारे भाजपनेही आपले आमदार ठेवलेले आहेत. त्यासाठी थोबाडावर प्रश्नचिन्ह उपस्थित करावं असं काय आहे. तुमचं ते गेट-टुगेदर आणि आमचं ते आम्ही आमदारांना बाजूला घेऊन गेलो. मुर्ख लोकं आहेत, अशा शब्दांत राऊतांनी भाजपला सुनावलं. शिवसेनेच्या दोन्ही जागांसह महाविकास आघाडीच्या चारही जागा निवडून येतील. दहा तारखेला सर्व चित्र स्पष्ट होईल, असंही राऊत यांनी सांगितलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT