अखेर सचिन वाझेची सही झाली! आता थेटच देशमुखांशी सामना

शंभर कोटींच्या वसुली प्रकरणात अनिल देशमुखांवर गंभीर आरोप...
Anil Deshmukh and Sachin Waze
Anil Deshmukh and Sachin WazeSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : मुंबईचे तत्काली पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी आरोप केलेल्या शंभर कोटींच्या वसुली प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन वाझे आता माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना थेटच भिडणार आहे. त्याने मंगळवारी न्यायालयात हजर राहत याबाबतच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी केली. त्यामुळे आता वाझे हा अधिकृतपणे माफीचा साक्षीदार बनला आहे. (Sachin Waze Latest Marathi News)

वाझे माफीचा साक्षीदार झाल्यानंतर सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनने (CBI) आरोपपत्र दाखल केलं असून त्यात अनिल देशमुख यांना प्रमुख आरोपी दाखवण्यात आले आहे. या प्रकरणात सचिन वाझे सहआरोपी आहे. त्यानेच माफीचा साक्षीदार होण्यासाठी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय न्यायालयाकडे अर्ज केला होता. सीबीआयनेही त्याला हिरवा कंदील दाखवल्यानंतर मागील आठवड्यात न्यायालयानेही मंजूरी दिली होती. (Anil Deshmukh Latest Marathi News)

Anil Deshmukh and Sachin Waze
तुमचं ते गेट-टूगेदर आणि आमचं..! संजय राऊतांनी भाजपला सुनावलं

सचिन वाझेच्या माफीच्या साक्षीदार होण्याला हरकत घेणारी कुंदन शिंदेंची याचिका न्यायालयाने फेटाळली. त्यानंतर मंगळऴारी (७ जून) झालेल्या सुनावणीवेळी माफीचा साक्षीदार होण्याबाबतच्या सर्व प्रक्रियांची पूर्तता करण्यात आली. वाझेनं सर्व कागदपत्रांवर स्वाक्षरी केली. न्यायाधीश डी.पी. शिंगाडे यांनी वाझेला माफीचा साक्षीदार होण्यासाठीच्या अटी व शर्तींची माहिती दिली.

सचिन वाझेचा जामीनासाठी अर्ज

सचिन वाझेनं माफीचा साक्षीदार झाल्यानंतर जामीनासाठी अर्ज केला आहे. त्यावर न्यायालयाने सीबीआयला उत्तर देण्याचे निर्देश देत जामीनावरील सुनावणी 20 जूनपर्यंत तहकूब केली. तसेच संजीव पालांडे यांनीही आरोपपत्र तांत्रिकदृष्ट्या अपूर्ण असल्याचा दावा करत जामीनासाठी अर्ज केला आहे. त्यावरही 20 तारखेला सुनावणी होणार आहे.

Anil Deshmukh and Sachin Waze
काँग्रेसची एका आमदारासाठी धावपळ; राज्यसभेच्या उमेदवाराचे धाबे दणाणले

दरम्यान, 100 कोटी वसुली प्रकरणी अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण देशमुख यांच्याविरोधात सीबीआयने एकूण 59 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. यात देशमुख यांना प्रमुख आरोपी दाखवण्यात आले आहे तर त्यांचे खाजगी सचिव संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांना सहआरोपी दाखवण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Marketing Minister Jaykumar Rawal assumes charge as chairman of the newly constituted high-level board of Mumbai APMC after its elevation to National Market status.
Rajya Sabha Bypoll Maharashtra | Navneet Rana | NCP Seat
Aniket Tatkare meets Sunetra Pawar and senior NCP leaders after being elected unopposed to the Maharashtra Legislative Council.
Navi Mumbai crime
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com