मुंबई : काँग्रेस पक्षामध्ये अध्यक्षपदाच्या प्रश्नावर अजूनही उत्तर मिळालेले नाही. राहुल गांधी यांनी अध्यक्षपद सोडल्यानंतर सोनिया गांधी यांनी हंगामी अध्यक्ष झाल्या. मात्र, अजूनही पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष नाही. काँग्रेसमधील जी-२३ गटाकडून अध्यक्षांची मागणी करण्यात येत असतानाच, शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी काँग्रेसला (Congress) या सगळ्या संकटातून बाहेर पडण्यासाठी सल्ला दिला आहे.
संजय राऊत मुंबईमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. त्यावेळी ते म्हणाले, काँग्रेस पक्षाला अध्यक्ष हवा की नको हा त्यांचा पक्षांतर्गत मुद्दा आहे. काँग्रेसहा देशातला सगळ्यात जुना पक्ष आहे. काँग्रेसने स्वातंत्र्यलढ्यात मोलाचे योगदान दिले. ६० वर्षांपेक्षा जास्त काळ देशावर राज्य केले. काँग्रेस पक्षाला अध्यक्ष नसणे याविषयी लोकांच्या मनात नक्कीच संभ्रम निर्माण होतो. राहुल गांधी, प्रियांका गांधी, सोनिया गांधी आज आहेत. तरीही काँग्रेसला अध्यक्ष नाही. कुणी तशी मागणी केली तर ती मागणी योग्य असेल की काँग्रेसचा अध्यक्ष कुठे आहे? असे राऊत म्हणाले.
जोपर्यंत काँग्रेसला एक अध्यक्ष नियुक्त केला जात नाही, तोपर्यंत आज जो काही गोंधळ सुरू आहे, तो थांबणार नाही. राहुल गांधींनी अध्यक्षपद सोडल्यानंतर काँग्रेस नेतृत्वहीन झाल्याचे दिसत आहे. याचा फायदा भाजपसारखे पक्ष घेत आहेत. काँग्रेस देशातला प्रमुख विरोधी पक्ष आहे. तो राहील. भविष्यात राजकारण करताना काँग्रेसशिवाय राजकारण होऊ शकत नाही. अशा वेळी काँग्रेस नेतृत्वाने अध्यक्षपदाचा विषय मार्गी लावला, त्यामुळे नक्कीच देशाला विरोधी पक्षाच्या आघाडीला पुढे जाता येईल, असेही साऊत यांनी सांगितले.
अध्यक्ष नसला तरी निर्णय वर्किंग कमिटी घेत असते. काँग्रेसचे नेतृत्व म्हणजे गांधी परिवार आहे. तरीही पक्षाला अध्यक्ष हवा. शिवसेना पक्षप्रमुख आमचे प्रमुख आहेत. आम्ही सगळेच काम करतो मात्र, नेते ते आहेत. त्या पदावर बसलेली व्यक्ती पक्षाला दिशा देत असतो. त्यामुळे पक्षाला अजून गती मिळेल. भाजप असो, काँग्रेस असो, शिवसेना असो किंवा इतर कोणता पक्ष असो. पक्षाचा मुख्य सेनापती असायलाच हवा.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.