महागाईने होरपळलेल्या जनतेला मोदी सरकारचा आणखी एक 'शॉक'

देशात सध्या महागाईचा भडका उडाला आहे. आता महागाईने होरपळलेल्या जनतेला मोदी सरकारने आणखी एक शॉक दिला आहे.
Narendra Modi
Narendra Modi
Published on
Updated on

नवी दिल्ली : देशात सध्या महागाईचा भडका उडाला आहे. पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Petrol) दरवाढीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. आता महागाईने होरपळलेल्या जनतेला मोदी सरकारने आणखी एक शॉक दिला आहे. आजही पेट्रोल आण डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. यामुळे इंधन दर उच्चांकी पातळीवर पोचले आहेत. या सप्टेंबरमधील शेवटच्या आठवड्यात डिझेलच्या दरात 1.25 रुपये आणि पेट्रोलच्या दरात 50 पैसे वाढ झाली आहे.

देशभरात आज पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 25 पैसे तर डिझेलच्या दरात 30 पैसे वाढ करण्यात आली. सध्या देशात इंधनाचे दर आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीवर पोचले आहेत. पेट्रोलच्या दराने देशभरात शंभरी ओलांडली आहे. अशातच स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या (LPG Cylinder) दरातही वाढ सुरू आहे. चालू वर्षात एलपीजी सिलिंडरच्या दरात तब्बल 190 रुपयांची वाढ झाली आहे. दिल्ली आणि मुंबईत विनाअंशदानित गॅस सिलिंडरची किंमत 884.50 रुपयांवर पोचली आहे.

Narendra Modi
पंजाबमधील वादळ शांत : मुख्यमंत्र्यांच्या भेटीत सिद्धू राजीनामा मागे घेण्याचे संकेत

दिल्लीत आज पेट्रोलचा दर 101.64 रुपये तर मुंबई 107.71 रुपयांवर गेला आहे. डिझेलचा दर दिल्लीत 89.87 रुपये आणि मुंबईत 97.52 रुपयांवर पोचला आहे. देशातील चार राज्ये व एका केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या निकाल लागल्यानंतर 2 मेपासून सातत्याने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होत आहे. यामुळे सामान्य नागरिकांना इंधन दरवाढीचे चटके बसत आहेत. देशात 4 मे ते 17 जुलै या कालावधीत पेट्रोलच्या दरात 11.44 रुपये आणि डिझेलच्या दरात 9.14 रुपये वाढ झाली आहे.

Narendra Modi
मोठी बातमी : कॅप्टन काँग्रेस सोडणार पण भाजपमध्येही जाणार नाहीत

जीएसटीत समावेश नाहीच

दरम्यान, पेट्रोल आणि डिझेल वस्तू व सेवा करांतर्गत (जीएसटी) आणण्याच्या प्रस्तावावर जीएसटी परिषदेने अद्याप निर्णय घेतलेला नाही. लखनौ येथे नुकत्याच झालेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत यावर निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, पेट्रोल व डिझेलवर जीएसटी लागू केल्यास देशभर फक्त 28 टक्के कर लागू होईल. म्हणजेच केंद्र सरकार आणि विविध राज्यांमध्ये असलेले सर्वप्रकारचे कर रद्द होऊन केवळ जीएसटी असेल. असे झाल्यास इंधनाचे दर 30 ते 40 टक्कयांनी खाली येऊ शकतात. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळू शकेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com