Sanjay Raut, Rahul Gandhi, Sharad Pawar
Sanjay Raut, Rahul Gandhi, Sharad Pawar Sarkarnama
मुंबई

शिवसेना काँग्रेससोबत? शरद पवारही घेणार दिल्लीत महत्वाची बैठक

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : दिल्लीतील आजचा दिवस महाराष्ट्रासाठी महत्वाच्या राजकीय घडामोडींचा ठरणार आहे. भाजपची साथ सोडल्यानंतर शिवसेनेची (Shiv Sena) वाटचाल संयुक्त पुरोगामी आघाडीमध्ये (UPA) सहभागी होण्याच्या दिशेने सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची दिल्लीत काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्याशी होणार भेट त्याचीच नांदी असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसची (NCP) आज दिल्लीत महत्वाची बैठक असल्याने राज्यातील राजकारणाची दिशा दिल्लीत ठरणार असल्याचे तर्कवितर्क लढवले जात आहेत.

शिवसेना भाजपपासून दुरावली असली तरी अद्याप युपीएमध्येही दाखल झालेली नाही. एनडीएतून बाहेर पडल्यानंतर शिवसेनेने राज्यात महाविकास आघाडीत सहभागी होत सत्ता मिळवली. आता युपीएमध्ये सहभागी होण्याच्या दिशेने सेनेची वाटचाल सुरू असल्याचे दिसते. त्याअनुषंगाने आजची राऊत आणि राहुल गांधी यांच्या भेट महत्वाची मानली जात आहे. राऊत हे बुधवारी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनाही भेटणार आहेत.

शिवसेनेची काँग्रेसशी जवळीक वाढू लागली असल्याचे बोलले जात आहे. पण यापूर्वी संजय राऊत यांनी अनेकदा युपीएच्या स्थितीसह अध्यक्षपदावरून काँग्रेसवर टीकाही केली आहे. असे असले तरी भाजपविरोधी आघाडी करण्यासाठी भाजपच्या विरोधातील सर्व पक्षांना एकत्र आणण्याची काँग्रेसची भूमिका आहे.

तसेच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही नुकतीत मुंबई येऊन राऊतांसह आदित्य ठाकरे यांची भेट घेतल्याने काँग्रेस शिवसेना दूर जाऊ देणार नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत युपीएबाबत शिवसेना निर्णय घेण्याच्या उंबरठ्यावर येऊ शकते, अशी चर्चा आहे.

दरम्यान, युपीएमध्ये महत्वाची भूमिका असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) पक्षाची महत्वाची बैठक आज दिल्लीमध्ये एक घेणार आहेत. राज्यातील सध्याची स्थिती, युपीए, ममता बॅनर्जी भेट, मराठा व ओबीसींचे राजकीय आरक्षण आदी मुद्यांवर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील ओबीसींचे २७ टक्के आरक्षण रद्द केले आहे. त्यामुळे राज्यातील निवडणुकांवर त्याचा थेट परिणाम होणार आहे. त्याचीही चर्चा या बैठकीत होऊ शकते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT