Sanjay Raut Latest Marathi News, Shivsena Latest Marathi News Sarkarnama
मुंबई

अब नही कोई बात खतरे की..! एकाकी पडलेल्या राऊतांचं सूचक ट्विट

राष्ट्रपतीपदाच्या भाजपच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची मागणी सर्व खासदारांनी केली आहे.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : शिवसेनेचे (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या चौदा खासदारांच्या बैठकीत सोमवारी संजय राऊत एकाकी पडले होते. राऊत वगळता सर्व खासदारांनी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या (BJP) उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची मागणी केली. खासदारांच्या मागणीला राऊत यांनी विरोध केल्याचे समजते. त्यानंतर मंगळवारी सकाळी त्यांनी सूचक ट्विट केलं आहे. (Sanjay Raut Latest Marathi News)

राऊतांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, अब नही कोई बात खतरे की, अब सभी को सभी से खतरा हैं..' राऊतांच्या ट्विटमागचा नेमका अर्थ काय, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. आता सगळ्यांनाच सगळ्यांपासून धोका आहे, यामागे त्यांच्या मनात नेमकं काय सुरू आहे, याबाबत चर्चा झडू लागल्या आहेत.

विशेष म्हणजे या ट्विटमध्ये त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री कार्यालय आणि प्रियांका गांधी यांना टॅग केले आहे. दरम्यान, कालच्या बैठकीमध्ये संजय राऊत वगळता उर्वरित खासदारांनी द्रौपदी मुर्मू यांना मतदान करण्याची भूमिका मांडली. या बैठकीनंतर राऊत हे माध्यमांशी संवाद न साधता मातोश्रीवरून रवाना झाले. राऊत अन्य खासदारांच्या भूमिकेवर नाराज असल्याचे सांगितले जात आहे.(Shivsena Latest Marathi News)

या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना खासदार गजानन किर्तीकर म्हणाले, बैठकीला 18 पैकी 4 खासदार गैरहजर होते. सगळ्या खासदारांनी भाजप उमेदवार आदिवासी असल्याने त्यांना मतदान करावे, अशी मागणी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. उद्धव ठाकरे उद्या आपली भूमिका जाहीर करणार आहेत. कोणताही वेगळा गट तयार केला जाणार नाही, असेही किर्तीकर यांनी स्पष्ट केले.

एकनाथ शिंदे गटात कोण जाणार यावर चर्चा झाली नाही, असेही किर्तीकर यांनी सांगितले. यावेळी त्यांना प्रश्न विचारण्यात आला की द्रौपदी मुर्मु यांना मतदान केले तर महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस नाराज होईल यावर काही चर्चा झाली का? त्यावर किर्तीकर यांनी सांगितले यावर कोणतीही चर्चा झाली नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT