Presidential Election 2022: मुर्मू की सिन्हा? मातोश्रीवरील बैठकीनंतर उद्धव ठाकरे घेणार निर्णय

Uddhav Thackeray | Presidential election news | भाजपकडून आदिवासी महिला आणि झारखंडच्या माजी राज्यपाल द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली
Uddhav Thackeray News in Marathi, Presidential election 2022 news updates
Uddhav Thackeray News in Marathi, Presidential election 2022 news updates

मुंबई: येत्या सोमवारी (18 जुलै) राष्ट्रपतीपदाची निवडणूक पार पडत आहे. यासंदर्भात काल (११ जुलै) मातोश्रीवर आयोजित शिवसेना खासदारांच्या बैठकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांची मते जाणून घेतली. यावेळी अनेक खासदारांनी राष्ट्रपतीपदासाठी आदिवासी महिला उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचा विचार करावा, अशी भूमिका मांडली. खासदारांची मते जाणून घेतल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav thackeray) हे दोन दिवसांत घेणार आहेत.(Uddhav Thackeray News in Marathi)

राष्ट्रपतीपदाची निवडणूकीसाठी भाजपकडून आदिवासी महिला आणि झारखंडच्या माजी राज्यपाल द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर विरोधी पक्षांकडून यशवंत सिन्हा यांना राष्ट्रपतीपदाची उमेदवारी देण्यात आली आहे. खासदार संजय राऊत आणि गजानन कीर्तिकर यांनी या बैठकीविषयीची माहिती दिली.

Uddhav Thackeray News in Marathi, Presidential election 2022 news updates
शिवसेनेची गळती थांबेना; शिंदे गटात आणखी २० नगरसेवक

संजय राऊत म्हणाले की, शिवसेना खासदारांच्या बैठकीत राष्ट्रपतीपदाचे उमेदवार द्रौपदी मुर्मू आणि यशवंत सिन्हा यांच्याबाबत चर्चा झाली. शिवसेनेने कायम राजकारणापलीकडे जाऊन एक व्यक्ती म्हणून राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारांना पाठिंबा दिला आहे. यापुर्वीही शिवसेनेने राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीसाठी प्रतिभाताई पाटील, टी. एन. शेषन, प्रणव मुखर्जी यांना पाठिंबा दिला आहे. आजही राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसंदर्भात झालेल्या चर्चेत सर्व खासदारांनी निर्णय घेण्याचे अधिकार उद्धव ठाकरेंना दिले आहेत. उद्धव ठाकरेंचा आदेश शिवसेनेचे सर्व खासदार आणि आमदारांना बंधनकारक असेल.

तर गजानन किर्तीकर म्हणाले की, राज्याच्या, देशाच्या भावना समजून उद्धव ठाकरे अंतिम निर्णय घेतील आणि त्या निर्णयामागे सर्व खासदारांचा पाठिंबा असेल. द्रौपदी मुर्मू एनडीएच्या उमेदवार असल्या तरी त्या एक आदिवासी आणि महिला आहेत. त्यामुळे राष्ट्रपतीपदासाठी शिवसेनेने त्यांना मतदान करावे, अशी भूमिका शिवसेनेच्या सर्व खासदारांनी उद्धव ठाकरेंसमोर मांडली. आता उद्धव ठाकरे येत्या एक-दोन दिवसांत अंतिम निर्णय घेतील.

मातोश्रीवर झालेल्या बैठकीत शिवसेनेचे 13 खासदार उपस्थित होते. पण संजय जाधव हे आजारी असल्याने बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत. संजय मंडलिक दिल्लीत असल्याने येऊ शकले नाहीत. हेमंत पाटील यांनी उपस्थित राहू शकणार नसल्याचे कळवले होते. या पावसामुळे कलाबेन डेलकर बैठकीला पोहचू शकल्या नाहीत. तर भावना गवळी आणि श्रीकांत शिंदे देखील उपस्थित राहिले नाहीत, असही खासदार गजानन कीर्तिकर यांनी सांगितलं

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com