Shiv Sena News Sarkarnama
मुंबई

Shiv Sena : मोठी बातमी : विधीमंडळातील शिवसेनेच्या कार्यालयात शिंदे गटातील आमदारांचा प्रवेश..

सरकारनामा ब्युरो

Shiv Sena News : शिवसेना पक्ष, धनुष्य़बाण चिन्ह गेल्यानंतरही ठाकरे गटाचे विधीमंडळातील कार्यालय कुणाला मिळणार,याबाबत दोन दिवसापासून चर्चा सुरु होती. या चर्चांना आता पुर्णविराम मिळाला आहे.

शिवसेनेच्या आमदारांनी (शिंदे गट) ठाकरे गटाचे विधीमंडळातील कार्यालय ताब्यात घेतले आहे. आज शिंदे गटातील आमदारांनी या कार्यालयात प्रवेश केला.

"विधीमंडळातील शिवसेना कार्यालयाचा ताबा शिंदे गटाने घेतला आहे, केंद्रीय निवडणूक आयोगाने योग्य निकाल दिला आहे. नियमात बसणाऱ्या सर्व गोष्टी आम्ही करु," असे आमदार भरत गोगावले यांनी कार्यालयात प्रवेश केल्यानंतर माध्यमांना सांगितले.

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह मिळाल्यानंतर शिंदे गट अधिकच आक्रमक झाला आहे. आता शिवसेनेच्या विधिमंडळातील पक्ष कार्यालयावर एकनाथ शिंदे यांच्या गटाने ताबा घेतला आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशनाने शिंदे गटाकडे शिवसेना नाव आणि धनुष्यबाण गेल्याने शिवसेनेशी संबधीत अन्य बाबींकडे लक्ष वेधले गेले आहे.

"निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार युवासेना आणि बाकीच्या आघाड्या देखील शिवसेनेसोबत शिंदेंच्या नियंत्रणात राहतील. निवडणूक आयोगाच्या निर्णयातच सांगितलं आहे की, 2018च्या तरतुदीत सुधारणा करावी. त्यामुळे आता ठाकरेंना पक्षाच्या नावांसह आघाड्यांची नाव देखील बदलावी लागतील," असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

बाळासाहेब ठाकरेंच्या संकल्पनेतून बांधण्यात आलेले दादर इथलं शिवसेना भवन अजूनही उद्धव ठाकरेंकडेच आहे. हे शिवसेनेचं मुख्यालय असलं तरी त्याची मालकी पक्षाकडे नाही, तर उद्धव ठाकरेंकडेच आहे. त्यामुळे शिंदे गट त्यावर दावा सांगू शकणार नाही.

शिवसेना भवन हे सध्या शिवाई ट्रस्टच्या नव्हे तर उद्धव ठाकरेंच्या ताब्यात आहे. चिन्ह आणि नाव शिंदे गटाला मिळणार याची कुणकुण लागल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पक्षनिधी इतर बँक खात्यात वळवला असल्याचीही चर्चा सध्या सुरू आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT