Ambadas Danve Sarkarnama
मुंबई

Ambadas Danve 'हा कुठे बाहेर असता, तर 'प्रसाद'च दिला असता'; अंबादास दानवेंची शिवसेना स्टाईल...

Ambadas Danve on Prasad Lad at vidhan bhavan : शिवसेना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आपल्या कालच्या वर्तणुकीवर ठाम आहेत. सत्ताधाऱ्यांनाच सभागृह चालून द्यायचे नाही. सत्ताधारीच गोंधळ घालण्याच्या तयारीत आहेत. प्रसाद लाड कोठे बाहेर भेटले असते, तर 'प्रसाद'च दिला असता'.

Pradeep Pendhare

Mumbai Vidhan Bhavan : शिवसेना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी काल विधिमंडळात भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या विषयी केलेल्या वर्तणुकीवर ठाम आहेत. हा विधिमंडळात होता. बाहेर कुठे असता, तर 'प्रसाद'च दिला असता, अशा शब्दात सांगत अंबादास दानवे आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. अंबादास दानवे यानंतर विधिमंडळाच्या कामकाजासाठी पुढे निघून गेले. त्यांच्या रुद्रावतारावरून विधिमंडळाच्या आजचे कामकाजात ते वादळ निर्माण करणार असेच दिसते. सत्ताधारी आणि विरोधक सभागृहात काय भूमिका घेतात, कोणता गोंधळ घालतात, याची चर्चा विधिमंडळ आवारात आहे.

अंबादास दानवे यांनी काल भाजप आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांना विधिमंडळात शिवसेना स्टाईल दोन शब्द सुनावले. प्रसाद लाड हे राहुल गांधी यांनी लोकसभेत हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून केलेल्या भाषणावर मत व्यक्त करत होते. निषेध व्यक्त करावा, अशी मागणी करत होते. यावर अंबादास दानवे यांनी हा इथे मांडण्याचा विषय आहे का? असा प्रश्न केला. त्यावेळेस भाजप आमदार प्रसाद लाड यांनी अंबादास दानवे यांच्याकडे हातवारे करून बोलले. यावर अंबादास दानवे चांगले संतापले. आपले आसन सोडून भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या दिशेने गेले. यावेळी अंबादास दानवे यांनी काही अपशब्द उच्चारले. यावरून भाजप सत्ताधाऱ्यांनी गोंधळ सुरू केला. सभागृह बाहेर येत अंबादास दानवे यांच्या राजीनामा आणि निलंबनाची मागणी केली.

सत्ताधारी भाजपने अंबादास दानवे (Ambadas Danve) यांचा जोपर्यंत राजीनामा घेतला जात नाही. तोपर्यंत सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी याबाबत सभापतींकडे तक्रार केली आहे. प्रवीण दरेकर यांनी देखील याबाबत तक्रारीचा सूर आवळला आहे. भाजप सत्ताधाऱ्यांनी आज विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून अंबादास दानवे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. अंबादास दानवे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. या सर्व प्रकारावर अंबादास दानवे यांनी शिवसेना स्टाईल प्रतिक्रिया दिली आहे.

अंबादास दानवे म्हणाले, "हा विधिमंडळात होता. बाहेर कुठे असता, तर प्रसादच दिला असता. सभागृहाची गरिमा यांनीच खराब केलेली आहे. यांनीच पायंडा पाडला आहे. दीड-दीडशे लोकांना यांनी सभागृहातून निलंबित केले आहे". सभागृहात सत्ताधारीत गोंधळ घालत आहेत. ते काम विरोधी पक्षाचे असते यांना सभागृह चालू द्यायचे नाही, असेही अंबादास दानवे यांनी म्हटले. सत्ताधाऱ्यांना जशास तसे उत्तर देण्याची तयारी सभागृहातील शिवसेना आमदारांनी केल्याची चर्चा आहे. अंबादास दानवे आणि प्रसाद लाड हे विधिमंडळात नेमके काय भूमिका घेतात आणि या दोघांमागे त्यांच्या पक्षातील आमदार कसे उभे राहतात, हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT