Video Prasad Lad : "मी आईच्या आठवणीनं रात्रभर रडलो," दानवेंच्या शिवीगाळानंतर लाड यांचं विधान

Prasad Lad On Uddhav Thackeray : दानवे यांच्या वक्तव्याचं ते समर्थन करतात का? असा सवाल प्रसाद लाड यांनी उद्धव ठाकरे यांना विचारला आहे.
Ambadas Danve Vs Prasad Lad
Ambadas Danve Vs Prasad Lad Sarkarnama

सोमवारी विधानपरिषदेत सत्ताधारी आमदार प्रसाद लाड आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. यावेळी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना अंबादास दानवे यांनी प्रसाद लाड यांना शिवीगाळ केली होती.

दानवेंनी केलेल्या शिवीगाळानंतर भाजप ( Bjp ) आणि महायुती आक्रमक झाली आहे. लाड यांच्यासह सत्ताधाऱ्यांनी दानवे यांच्या निलंबनासह विरोधी पक्षनेतेपदाच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. यातच प्रसाद लाड यांनी दानवे यांच्यावरून शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारला आहे.

"आईला शिव्या देणाऱ्या नेत्याला उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) जाब विचारणार आहेत की नाही? की त्यांच्या वक्तव्याचं समर्थन करतात?" असा सवाल लाड यांनी उपस्थित केला आहे. ते विधिमंडळ परिसरात प्रसारमाध्यांशी संवाद साधत होते.

लाड ( Prasad Lad ) म्हणाले, "मी माझ्या आईच्या आठवणीनं रात्रभर रडलो. मला झोप आली नाही. माझ्या नजरेसमोर आईचा चेहरा सतत येत होता. एका आमदाराच्या आईला शिवी देणाऱ्या नेत्यावर उद्धव ठाकरेंनी कारवाई करावी."

"दानवे यांना काहीही शिक्षा केली तरी, त्यांच्या राजीनामा देखील घ्यायला हवा. शिवाय आमदाराच्या आईस शिव्या देणाऱ्याला उद्धव ठाकरे जाब विचारणार आहेत की नाही? दानवे यांच्या वक्तव्याचं ते समर्थन करतात का?" असा सवाल प्रसाद लाड यांनी उद्धव ठाकरे यांना विचारला आहे.


( Edited By : Akshay Sabale )

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com