Sanjay Raut Vs Congress Sarkarnama
मुंबई

Sanjay Raut Vs Congress : 'आमच्यामुळे काँग्रेसच्या जागा वाढल्या'; काँग्रेसच्या 'खुमखुमी'ला संजय राऊतांनी फटकारलं

Shiv Sena Sanjay Raut slammed the Congress Chief Minister statement : शिवसेनेचे संजय राऊत यांनी काँग्रेसच्या मुख्यमंत्रीमंत्री पदाच्या विधानावर लोकसभेत काँग्रेसच्या जागा कशा वाढल्या, याची आठवण करून देत, सुनावलं.

Pradeep Pendhare

Mumbai News : काँग्रेसचे विधिमंडळ नेते ज्येष्ठ आमदार बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री काँग्रेसचा होणार या विधानानंतर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत आज सकाळी काय बोलणार याकडं लक्ष लागले होते. संजय राऊत यांनी त्यांच्या स्टाईलमध्ये काँग्रेसला चांगलंच सुनावलं.

"कोणाला खुमखुमी असेल, लहान भाऊ, मोठा भाऊ, मधला भाऊ किंवा धाकटा भाऊ, तर महाराष्ट्रात काय चित्र आहे, हे भविष्यात कळेल. शिवसेनेमुळे काँग्रेसच्या जागा वाढल्या असून, हे जर ते विसरले असतील किंवा विसरू पाहत असतील, तर त्याची आठवण करून देतो", असं संजय राऊत यांनी म्हटलं. आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सकाळी माध्यमांशी संवाद साधला. काँग्रेसच्या कोकण विभागातील मेळाव्यात विधिमंडल नेते ज्येष्ठ आमदार बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसचा मुख्यमंत्री होणार, असं विधान केलं होते. त्यावर संजय राऊत यांनी आक्रमक भूमिका घेत सुनावलं. कोणाला खुमखुमी असेल, लहान भाऊ, मोठा भाऊ, मधला भाऊ किंवा धाकटा भाऊ, तर महाराष्ट्रात काय चित्र आहे, हे भविष्यात कळेल, असा इशारा संजय राऊतांनी दिला. संजय राऊत यांच्या आक्रमक भूमिकेमुळे महाविकास आघाडीत शिवसेना आणि काँग्रेसमधील धुसफूस चव्हाट्यावर आली आहे.

संजय राऊत म्हणाले, "काँग्रेसचे (Congress) प्रभारी पहिल्या दिवसापासून महाविकास आघाडीमध्ये लहान-मोठा भाऊ, असं काही नाही, असं म्हणत आहेत. कोणाला खुमखुमी असेल, लहान भाऊ, मोठा भाऊ, मधला भाऊ किंवा धाकटा भाऊ, तर महाराष्ट्रात काय चित्र आहे, हे भविष्यात कळेल. काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेत्यांची भूमिका स्पष्ट आहे. काँग्रेस पक्षाला लोकसभेत तीन-एक जागा जास्त मिळाल्या आहेत. कोणला वाटत असेल, आम्ही मोठे भाऊ आहोत, उंच भाऊ आहोत, त्यांनी लक्षात घ्यावं की, त्यांच्या जागा वाढण्यात शिवसेनेचे योगदान किती आहे?" कोल्हापूर, रामटेक, अमरावती या तीन जागा आमच्या त्यांना दिल्या. शिवसेनेमुळे त्यांच्या या तीन जागा वाढल्या. हे जर ते विसरले असतील, किंवा विसरू पाहत असतील, पण मी पुन्हा सांगतो, काँग्रेसचे वरिष्ठ नेते अशा प्रकाराच्या भूमिका कधी घेणार नाहीत, असे संजय राऊत यांनी म्हटलं.

काँग्रेसचाच नाही, तर 'मविआ'चा...

लोकसभेत जास्त जागा मिळाल्यानं काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला आहे का? यावर संजय राऊत म्हणाले, "आत्मविश्वास सर्वांचाच वाढला आहे. काँग्रेसचाच कशाला वाढायला पाहिजे. महाविकास आघाडीचाच आत्मविश्वास वाढला आहे. तो लोकसभेचा आत्मविश्वास होता. विधानसभेचा आत्मविश्वासासाठी परत काम करावं लागले. त्यासाठी तिन्ही पक्षानं एकत्र राहावं लागेल. आत्मविश्वास राहिला, तर ते एकटे लढणार नाहीत. तीन पक्ष एकत्र राहिले नाहीत, तर आत्मविश्वास कसा वाढले?" 'मविआ' घट्ट झाल्याशिवाय आत्मविश्वास कसा वाढेल? असा वाढला, असं कोणाला वाटत असेल, तर त्यांचा आत्मविश्वास काय आहे, कसा आहे, हा अभ्यासाचा विषय आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं.

जागा वाटप किचकट

लोकसभेला तिन्ही पक्ष मजबुतीनं लढले, त्याचपद्धतीन विधानसभेला आम्ही तीन पक्ष एकत्र लढणार आहोत, असं सागून लोकसभेला जागा वाटप अधिक सोपं होते. कारण तिथं 48 जागांचीच चर्चा होती. विधानसभेला 288 जागांचा विषय आहे. तीन प्रमुख पक्ष आहे. शिवाय लहान मित्र पक्ष आहे. त्या सर्वांना समावून घेण्याची भूमिका आहे. यात आम्ही यशस्वी होऊ, असे संजय राऊत यांनी सांगितलं.

तिसरी आघाडीला फटकारलं

संजय राऊत यांनी तिसऱ्या आघाडीला फटाकरलं. "तिसरी आघाडी कायम सत्ताधाऱ्यांना मदत करण्यासाठी बनवली जाते. तिसरी आघाडी हे केंद्रात किंवा राज्यातील सत्तेत असणाऱ्यांना काही अडचणीचे विषय असतात, मग तीन तिसरी आघाडी निर्माण करून, मतांमध्ये कशी दुफळी माजवता येईल, यासाठी काम करतात. आतापर्यंत तसाच इतिहास आहे. महायुती आणि मविआमध्ये लढत आहे. 'मविआ'ची मते कमी करण्यासाठी अशा आघाड्या स्थापन करायच्या. पैशांचा वापर, पदांचा वापर करायचा, असं धोरण दिसते आहे, संजय राऊत यांनी म्हटलं.

जागा वाटपावर मतभेद नाहीत

'मविआ'ची जागा वाटपावर चर्चेसाठी बैठक आहे. मुंबईतील सहा जागांवरील चर्चावर, अशा काही बातम्या येत आहे, परंतु तसं काही प्रत्येक जागेवर चर्चा होत आहे. जिंकण्याची क्षमता असलेल्यांकडे जागा दिली जाते. कोणत्याही जागा वाटपावर मतभेत नाही. काही असेल, तर आम्ही परत चर्चेसाठी बसू, असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT