Sanjay Shirsat : क्रेन, भलामोठा हार, संजय शिरसाट यांची 'बाजीराव' थाटात एन्ट्री

Sanjay Shirsat CIDCO President : आमदार संजय शिरसाट मंत्रिपद हुकल्याने नाराज होते. आते त्यांची सिडको महामंडळाच्या अध्यक्षपदी वर्णी लागली आहे.
Sanjay Shirsat
Sanjay Shirsat Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राजकारण, सत्ताकारणात नेते नेहमीच चार पावले पुढे जाण्याच्या प्रयत्नात असतात, तर त्यांचे उत्साही कार्यकर्ते किती पावले पुढे जाऊन, नेत्यांसाठी काय करू अन् काय नको, आणि उत्साहाच्या भरात काय करतील, याचा नेम नसतो.

असाच प्रकार सिडकोच्या अध्यक्षपदाची धुरा खांद्यावर घेतलेले आमदार, शिंदेंच्या शिवसेनेतील धडाकेबाज प्रवक्ते संजय शिरसाट यांच्या स्वागतात घडला.

'आपला नेता थेट मंत्री नाही; मात्र बड्या महामंडळाचा अध्यक्ष झाल्याचा आनंद भरून कार्यकर्त्यांनी सिडको कार्यालयाच्या आवारात शिरसाटांचे, असे काही स्वागत केले की, सिडकोचीच नव्हे, तर अख्या सरकारमधील प्रशासकीय यंत्रणा आवाक झाली.

भलीमोठी क्रेन, त्या क्रेनला शोभेल एवढा दीड-पावणेदोनशे किलोचा फुलांचा, सोबतीला फटाके वाजून शिरसाटांच्या उत्साही कार्यकर्त्यांनी बेलापूर दणाणून सोडलं. यानिमित्ताने या कार्यकर्त्यांनी दीड महिनाआधीच दिवाळी आटोपल्याचे दिसून आली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सरकारमधील साऱ्याच मंत्र्यांकडे 'वजन' ठेवून असलेल्या बाजीराव चव्हाण कार्यकर्त्यानेच आमदार शिरसाटांचे जंगी स्वागत केल्याचं सांगितलं जातं. त्यामुळेच सिडकोच्या कार्यालयामधील शिरसाटांची 'एन्ट्री' तशीच 'बाजीराव' थाटात झाल्याचं दिसून येत आहे.

Sanjay Shirsat
Assembly North East Mumbai : ठाकरेंच्या खासदाराचे टेन्शन वाढले, निवडणुकीतील 'ती' चूक भोवणार?

शिवसेना (Shiv Sena) एकनाथ शिंदे गटात मंत्रिपद हुकलेल्यांने अनेक जण नाराज आहेत. यात एकनाथ शिंदे यांच्या बंडाला सुरवातीपासून साथ देणारे छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) पश्चिम मतदारसंघाचे आमदार संजय शिरसाट देखील होते.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांना सिडकोचं अध्यक्षपद बहाल केलं गेलं. विधानसभा निवडणुकीला अवघे दीड ते दोन महिने राहिले असताना, सिडकोचं अध्यक्षपदी आमदार शिरसाट यांची वर्णी म्हणजे, त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न असल्याचं मानलं जातं.

Sanjay Shirsat
Assembly Election 2024 : 80 नाही, 90 नाही, तर काँग्रेसला हव्यात तब्बल 'एवढ्या' जागा; ठाकरेंची शिवसेना अन् 'NCP' काय करणार?

चर्चा तर होणारच

आमदार संजय शिरसाट यांनी अध्यक्षपदाचा पदभार गुरूवारी स्वीकारला. बेलापूर इथल्या सिडको भवनात त्यासाठी आले होते. यावेळी त्यांच्या स्वागताला समर्थकांनी कार्यालयाबोहेर गर्दी केली होती. यामध्ये मराठवाड्यातील कार्यकर्त्यांची संख्या खूप होती. कार्यकर्त्यांनी क्रेनने एक मोठे पुष्पहार आणला होता.

क्रेन आणि तो पुष्पहार, याशिवाय संजय शिरसाट यांच्या स्वागताला लावण्यासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार बॅनरबाजी चर्चेत आलीय. राजकीय नेत्यांवर क्रेन किंवा 'जेसीबी'तून फुलांची उधळण करण्याची पद्धत ग्रामीण भागात आढळते.

पण ही पद्धत संजय शिरसाट यांच्या समर्थकांनी ही पद्धत थेट नवी मुंबईत आणली. सरकारी कार्यालयात, सिडको महामंडळाच्या अध्यक्षपदी नेमणूक झालेले आमदार शिरसाट यांच्या शुभेच्छासाठी भलामोठा पुष्पहार आणला गेला. हा पुष्पहार आणि बॅनर लावण्यासाठी क्रेन चक्क सिडको भवनात घुसवला होता.

दालनापर्यंत फुलांच्या पाकळ्या अंथरल्या

आमदार शिरसाट यांच्या गळ्यात हा पुष्पहार क्रेनच्या मदतीनं घालण्यात आला. तसंच सिडको प्रशासनानं त्यांचं तुतारी वाजवून आणि औक्षण करत आमदार शिरसाट यांचं स्वागत करण्यात आलं. आमदार शिरसाट यांना त्यांच्या सिडको भवनातील दालनापर्यंत नेण्यासाठी फुलांच्या पाकळ्या अंथरल्या होत्या.

तिथंही फुलांची सजावट केली होती. आमदार शिरसाट यांनी एकप्रकारं शक्तिप्रदर्शन केलं. गर्दीमुळं सिडको भवनाची सर्व प्रवेशद्वारे खुली ठेवण्यात आली होती. त्यामुळे आमदार शिरसाट यांच्या स्वागत सोहळ्याची चर्चा नवी मुंबईत होती.

कोण आहेत बाजीराव चव्हाण ?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारात बाजीराव चव्हाणांचा दबदबा आहे. या सरकारमधील आमदारच काय, कॅबिनेट मंत्र्यांकडून बाजीरावच्या शब्दाला मोठा 'मान' असल्याचे बोलले जाते. त्यामुळे प्रशासकीय वर्तुळातही बाजीराव पडद्यामागूनही मोठी ताकद लावत असल्याचेही चर्चा होते. एकनाथ शिंदेंच्या युवासेनेचे पदाधिकारी असलेले बाजीराव मराठवाड्यातून आमदारकीच्या घोड्यावर बसले असल्याचेही सांगितले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com