shishir shinde Sarkarnama
मुंबई

Shishir Shinde resign : मनासारखं काम मिळत नसल्याने शिशिर शिंदेंचा ठाकरे गटाला 'जय महाराष्ट्र' ; वर्धापनदिनाच्या पूर्वसंध्येला..

Maharashtra Politics : शिंदे हे 2009 ला भांडुप विधानसभा मतदार संघातून आमदारपदी निवडून आले होते.

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शिशिर शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राजीनाम्याचे पत्र त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिले आहे. राजीनामा देताना शिंदेंनी खंत व्यक्त केली आहे.

शिवसेनेत (ठाकरे गटात) मला मनासारखं काम मिळत नाही, म्हणून मी राजीनामा देत असल्याची खंत शिशिर शिंदे यांनी आपल्या पत्रात व्यक्त केली आहे. शिशिर शिंदे यांची 19 जून 2018 रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून शिवसेनेत घरवापसी झाली होती.

शिशिर शिंदे यांनी म्हटलं आहे की चार वर्षांच्या कालावधीत माझे कर्तृत्व, संघटन कौशल्य, हातात घेतलेले काम फत्ते करण्याची जबरदस्त जिद्द, समाजाच्या विविध क्षेत्रात असलेले जिव्हाळ्याचे संबंध या सर्व बाबी दुर्लक्षित करण्यात आल्या याची मला खंत वाटते. चार वर्षात माझे नेतृत्व आणि कौशल्याकडे ठाकरे गटानं दुर्लक्ष केलं. माझी घुसमत मी थांबवतो, असे शिंदे यांनी म्हटलं आहे.

"माझ्या जीवनातली चार अमूल्य वर्षे फुकट गेली अशी माझी धारणा आहे. 30 जून 2022 रोजी माझी "शिवसेना उपनेते" म्हणून नियुक्ती अचानकपणे झाली. जबाबदारी नसलेले शोभेचे पद मिळाले," असे शिंदेंनी पत्रात म्हटलं आहे. शिशिर शिंदे हे 2009 ला भांडुप विधानसभा मतदार संघातून आमदारपदी निवडून आले होते. त्यानंतर 2014 साली झालेल्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता.

2018 मध्ये शिवसेनेत प्रवेश करताना ते भावुक झाले होते. 'उद्धव ठाकरे यांचा हातात हात घेतल्यानंतर मला शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचा स्पर्श होत असल्याचे वाटते. वयाच्या सतराव्या वर्षी एका हातात धोंडा, तर दुसऱ्या हातात भगवा झेंडा घेऊन शिवसेनेत सहभागी झालो होतो. मात्र, त्यानतंर "मनसे'त गेलो, पण "मनसे'त असताना मी शिवसेनेबाबत जे काही बोललो असेल त्याबाबत माफ करा. मोठ्या मनाने मला पुन्हा शिवसेनेत प्रवेश दिल्याने मी आभारी आहे. आता पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा सर्वत्र फडकवण्यासाठी त्याच हिमतीने मी कामाला लागणार असून, शिवसेनेचा मुख्यमंत्री होत नाही तोपर्यंत मी थांबणार नाही," असे शिशिर शिंदेंनी म्हटलं होतं.

शिशिर शिंदे पत्रात म्हणतात..

  • माझ्या जीवनातली चार अमूल्य वर्षे फुकट गेली अशी माझी धारणा आहे. 30 जून 2022 रोजी माझी "शिवसेना उपनेते" म्हणून नियुक्ती अचानकपणे झाली. जबाबदारी नसलेले शोभेचे पद मिळाले.

  • चार वर्षांच्या कालावधीत माझे कर्तृत्व, संघटन कौशल्य हातात घेतलेले काम फत्ते करण्याची जबरदस्त जिद्द, समाजाच्या विविध क्षेत्रात असलेले जिव्हाळ्याचे संबंध या सर्व बाबी दुर्लक्षित करण्यात आल्याची मला खंत वाटते.

(Edited By : Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT