Aaditya Thackeray Sarkarnama
मुंबई

Disha Salian CBI FIR : दिशा सालियन मृत्यू प्रकरणात CBIचा गुन्हा दाखल; ‘FIRमध्ये कोणाचेही नाव नाही’, वकिलांचा वेगळाच दावा

CBI files FIR in Disha Salian death case after Bombay High Court order : उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर CBIची कारवाई; कट, हत्या, पुरावे नष्ट केल्यासह विविध आरोपांनुसार गुन्हा, ॲड. नीलेश ओझा यांचा आदित्य ठाकरे यांच्यासह अन्य नावांचा दावा

Pradeep Pendhare

Aaditya Thackeray Disha Salian Case : दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतची व्यवस्थापक दिशा सालियनच्या मृत्यूप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) गुन्हा दाखल केला आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे कार्यवाही केली असून, या गुन्ह्यामध्ये कोणाचेही नाव नाही, असे सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे, रोहन रॉय, रिया चक्रवर्ती, तत्कालीन मुंबई पोलिस आयुक्त परमबीरसिंह यांच्यासह अन्य व्यक्तींची नावे असल्याचा दावा सतीश सालियन यांचे वकील ॲड. नीलेश ओझा यांनी केल्याचे वृत्त ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने दिले आहे.

मालाड परिसरामध्ये आठ जून 2020 रोजी एका इमारतीच्या 12व्या मजल्यावरून पडून दिशाचा मृत्यू झाला होता. मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. या घटनेनंतर काही दिवसांनी सुशांतसिह राजपूत त्याच्या घरामध्ये मृतावस्थेत आढळला होता. या दोन्ही घटनांची चर्चा राज्यात खूप चर्चा झाली होती. राज्य सरकारने सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविला होता.

दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची सीबीआय (CBI) चौकशी करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी दिले आहेत. या पार्श्वभूमीवर, सीबीआयने गुन्हा दाखल केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी सोमवारी दिली. यामध्ये कोणाचेही नाव असून, गुन्ह्याचा कट, सामूहिक बलात्कार, हत्या, पुरावे नष्ट करणे आणि सरकारी अधिकाऱ्यांनी खोटे पुरावे नोंदविल्या प्रकरणी कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे, असे सांगण्यात आले.

या फिर्यादीमध्ये आमदार आदित्य ठाकरे, डिनो मोरिया, सूरज पांचोली, आदित्य ठाकरे यांचे अंगरक्षक, रोहन रॉय, रिया चक्रवर्ती, परमबीर सिंह, तत्कालीन पोलिस उपायुक्त विशाल ठाकूर, तसेच खोटे रेकॉर्ड तयार करणारे मालवणी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक आणि एसआयटीचे सदस्य यांची नावे आहेत. त्यानंतर डॉ. संजय यादव आणि न्याय्यवैद्यक प्रयोगशाळेतील रासायनिक विश्लेषकाचेही नाव आहे. या विश्लेषकाने सामूहिक बलात्कारासंदर्भातील अहवालात बदल केल्याचा आरोप आहे.

तसेच, या प्रकरणात आरोपी म्हणून अनेकांची मोठी यादी आहे. सीसीटीव्ही फुटेजमुळे संपूर्ण घटनाक्रमाची आधीचा घटनाक्रम खोटा असल्याचे सिद्ध झाले आहे. या प्रकरणातील पुरावे दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला. प्रथमदर्शनी प्रकरणात तथ्य आढळल्याने न्यायालयाने हे प्रकरण सीबीआयकडे सोपवले, असेही ओझा यांनी म्हटल्याचे ‘एएनआय’च्या वृत्तात म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT