

Maharashtra Politics : येत्या वर्षभरात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर पुन्हा एकदा उद्धव ठाकरे विराजमान होऊ दे, असे साकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी गणरायाला घातले.
शिवसेनेशी, उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहिलेल्या आमच्या सारख्या पदाधिकारी, कार्यकर्ते व शिवसैनिकांची समृद्धी होऊ दे, अशी प्रार्थनाही खैरे यांनी गणरायाच्या आगमना निमित्त केली.
शिवसेना उद्धव बाळसाहेब ठाकरे पक्षाच्या (Shivsena UBT) वतीने 17 सप्टेंबर म्हणजे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर मराठावाड्यात 'मराठवाड्याचा विकास तुमसे ना हो पायेगा' हे जनआंदोलन हाती घेण्यात आले आहे. येत्या 17 तारखेला उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठवाड्याच्या रखडलेल्या विकास प्रश्नांवर जाब विचारण्यासाठी जनआंदोलन केले जाणार आहे. दरम्यान,
आज राज्यभरात गणेशोत्सवाला उत्साहात प्रारंभ झाला. घरोघरी गणरायाचे आगमन झाले. छत्रपती संभाजीनगरचे (Chhatrapati Sambhajinagar) ग्रामदैवत असलेल्या संस्थान गणपती येथे गणरायाची प्राणप्रतिष्ठा सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितित करण्यात आली. चंद्रकांत खैरे यांचीही यावेळी व्यासपीठावर उपस्थिती होती.
यावेळी माध्यमांशी बोलताना आपण गणरायाकडे राज्यातील सर्व जनता, शेतकरी सुखी होऊ दे, समाधानकारक पाऊस होऊ दे, असे साकडे घातल्याचे त्यांनी सांगीतले. उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री असताना काही जणांनी गद्दारी केली. त्यामुळे त्यांना पदावरून पायउतार व्हावे लागले. येत्या वर्षभरात पुन्हा उद्धव ठाकरे हे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत, अशी प्रार्थना आम्ही गणरायाच्या चरणी केली आहे.
गद्दारी करूनही ज्यांची समृद्धी होत आहे, त्यांच्याऐवजी जे निष्ठावंत राहिले, संकटातही उद्धव ठाकरे यांची साथ न सोडता त्यांच्या पाठीशी खंबीरपणे आजही उभे आहेत, त्या सर्व निष्ठावंतांची समृद्धी होऊ दे, असे साकडेही मी गणरायाला घातल्याचे खैरे यांनी सांगितले.
मराठवाड्याच्या विकासासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोट्यवधी रूपयांच्या घोषणा करण्यात आल्या. प्रत्यक्षात तरतूद मात्र काहीच केली नाही. परिणामी मराठवाड्याचा विकासाचा अनुशेष वाढत गेला. याचा जाब या सरकारला विचारण्यासाठीच 17 सप्टेंबरला उद्धव ठाकरे छत्रपती संभाजीनगरमध्ये येणार आहेत. त्यांच्या नेतृत्वात होणाऱ्या जनआंदोलनाने आम्ही सरकारला घाम फोडू, असा इशाराही खैरै यांनी दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.