Anil Parab Sarkarnama
मुंबई

Anil Parab : 'यजमानांनी बोलवायचे आणि स्वागताला आचाऱ्याने जायचे', सत्ताधाऱ्यांच्या 'या' कृतीवर अनिल परब भडकले

Anil Parab Shiv Sena विधानसभेत उद्या उपराष्ट्रपती येत आहेत. त्यांच्या स्वागताला सभापती नसणे हे शोभनीय नाही, असे आमदार अनिल परब यांनी म्हटले आहे. सत्ताधाऱ्यांमध्ये वाद असल्याने निवडणूक होत नसल्याचा टोला देखील परब यांनी लगावला आहे.

Roshan More

Anil Parab News : विधान परिषदेतील सभापती पदावरून ठाकरे गटाचे नेते, आमदार अनिल परब यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. 'सत्ताधाऱ्यांचा आपआपसातील वादांमुळे हे पद रिक्त आहे. विधानसभेत उद्या राष्ट्रपती येत आहेत. त्यांच्या स्वागताला सभापती नसणे हे चुकीचे आहे. यजमानाने बोलवायचे आणि स्वागताला आचाऱ्याने जायचे, अशी परिस्थिती उपराष्ट्रपतीच्या स्वागतासाठी सत्ताधाऱ्यांची असणार आहे.', असा टोला आमदार अनिल परब यांनी लगावला.

विधान परिषदेचे सभापती पदासाठी निवडणूक घ्यावी यासाठी महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने मंगळवारी राज्यपालांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी महाविकास आघाडी MVA सरकारच्या काळात कॅबिनेटमध्ये मंजूर झालेल्या ठरावाकडे लक्ष वेधले. हा ठराव अजून मंजूर झालेला नाही. त्या ठरावाचा आधार घेऊन विधानपरिषद सभापती पदासाठी निवडणूक घेता येईल. याकडे राज्यपालांचे लक्ष वेधण्यात आले. या सर्व भेटीवर शिवसेनेचे नेते आमदार अनिल परब यांनी माध्यमांशी संवाद साधताना सत्ताधाऱ्यांवर टीका केली.

आमदार अनिल परब Anil Parab म्हणाले, 'महाविकास आघाडीचा शिष्टमंडळ काल राज्यपालांना विधान परिषदेतील सभापतीच्या रिक्त पदाच्या निवडणुकीसाठी भेटले. हे पद गेल्या अडीच वर्ष रिक्त आहे. महाविकास आघाडीकडे सरकार असताना आम्ही कॅबिनेटचा ठराव राज्यपालांकडे पाठवला होता. तो ठराव अजून नामंजूर झालेला नाही. त्या ठरावाच्या आधारावर वेळ देऊ शकता आणि निवडणूक जाहीर करू शकतात.'

'विधानसभेमध्ये उद्या देशाचे उपराष्ट्रपती येणार आहेत. अशा वेळेला त्यांच्या स्वागतासाठी सभापती नसणे शोभनीय नाही. म्हणजेच, यजमानाने बोलवायचं आणि आचाऱ्याने स्वागताला जायची, अशी परिस्थिती असणार आहे. कारण यजमानच या सभागृहात नाहीत. थोडक्यात डॉक्टरच्या ऐवजी कंपाउंडर हा दवाखाना चालवत आहे. अशी परस्थिती या विधानमंडळामध्ये आहे. आजच्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये देखील विधान परिषदेच्या सभापतीच्या निवडीचा कार्यक्रम नाही.

सभागृहाचे कामकाजासाठी दोनच दिवस बाकी आहेत. परंतु आता सत्ताधाऱ्यांना सभापती अत्यावश्यक आहे, असे वाटत नाही. सभापती पदासाठी निवडणूक न घेण्याची तयारी सत्ताधाऱ्यांनी केल्याचे दिसते. राज्यपालांनी याची दखल घेऊन कोणतेही पद रिक्त राहणार नाही याची काळजी घ्यावी, असे आमदार अनिल परब यांनी म्हटले.

सत्ताधाऱ्यांमध्ये वाद

सत्ताधारी पक्षाकडे पुरेशी संख्या बळ आहे. त्यामुळे त्यांचा सभापती पदासाठी निवडणूक घेण्यास काही अडचण नाही. असे असताना देखील ते आज निवडणूक घेत नाहीत. त्यांच्यातील आपसातील भांडणामुळे मोठे घटनात्मक पद रिक्त राहत आहे. जनतेसमोर हा चांगला मेसेज नाहीये तुमचे आपआपसामध्ये काही भांडण असू देत. पण हे पद भरलं गेलं पाहिजे, असे अनिल परब यांनी म्हटले.

(Edited By Roshan More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT