Bacchu Kadu : बच्चू कडू धर्मरावबाबा आत्रामांवर तुटून पडले, मध्यस्थी करत अजित पवार म्हणाले...; नेमकं घडलं काय?

Bacchu Kadu Vs Ajit Pawar : दूध भेसळीवरून बच्चू कडू विधानसभेत आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. यानंतर अजित पवार यांनी 'कडक' भूमिका घेण्याचं निर्देश दिले.
ajit pawar baba atram bachhu kadu.
ajit pawar baba atram bachhu kadu.sarkarnama
Published on
Updated on

राज्यात अनेक ठिकाणी दुधात भेसळ केल्याचे प्रकार समोर आले आहेत. याचवरून आमदार बच्चू कडू यांनी आक्रमक भूमिका घेत मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना धारेवर धरलं आहे. "भेसळयुक्त दुधामुळे शेतकरी आणि ग्राहकही मरत आहेत. यावर ठोस कारवाई होत नाही," अशी खंत बच्चू कडू यांनी व्यक्त केली.

तर 'कडक' कारवाई करण्यात येईल, असं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी दिलं आहे. यावेळी अन्न आणि औषध मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी किती भेसळयुक्त दूध जप्त केले? किती दंड आकारण्यात आला? याची माहिती दिली.

बच्चू कडू ( Bacchu Kadu ) म्हणाले, "रोज 60 लाख भेसळयुक्त दूध जनतेला दिलं जातं. भेसळयुक्त अन्न आणि पादार्थामुळे कॅन्सर होण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. भेसळयुक्त दुधामुळे शेतकरी आणि ग्राहकरी मरत आहेत. भेसळयुक्त दुधावर ठोस कारवाई होत नाही. प्रशासनानं केलेल्या कारवाई प्रचंड भ्रष्टाचार होतो. येणाऱ्या काळात भेसळयुक्त दूध मिळणार नाही, याबाबत उत्तर पाहिजे."

यानंतर अन्न आणि औषध मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त दुधावर कारवाई केल्याचं सांगितलं. "दूध आणि दुग्धजन्य पदार्थाचे नमुने तपासण्यात येत आहेत. जवळपास 25 हजार 338 भेसळयुक्त दूध जप्त केले आहे. तर, 13 लाख 44 हजार रूपयांचा दंड आकारण्यात आला आहे. मोठ्या प्रमाणात भेसळ होते, हे मान्य आहे. यासाठी अधिकाऱ्यांना तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. 20 जणांचं पथकंही तैनात करण्यात आलं आहे," असं बाबा आत्राम यांनी म्हटलं.

ajit pawar baba atram bachhu kadu.
Assembly Session : मराठा अन् ओबीसी आरक्षणावरून राडा, सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवर सोडले शब्दांचे अस्र; मग अध्यक्षांनी...

यावर बच्चू कडू म्हणाले, "भेसळयुक्त दूध जनता पित असेल, तर याचे परिणाम काय होतील? हा फार गंभीर विषय आहे. शेतकरी आणि ग्राहक मरत असताना मंत्री बिंधास्त उत्तर देत आहेत. एकही लिटर भेसळयुक्त दूध ग्राहकाला मिळणार नाही, यासाठी सरकार काय पावले उचलणार आहे?"

यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं, "भेसळयुक्त दुधाचा प्रश्न अनेकदा आपल्याला भेडसावत आहे. हा जनतेच्या जीवनाशी खेळण्याचा प्रकार आहे. त्यामुळे भेसळयुक्त दूध करणाऱ्याला फाशीची शिक्षा मिळण्यासाठी कायदा केला होता. कायदा करून दिल्लीला राष्ट्रपतींकडे संमतीसाठी पाठवण्यात आला होता. पण, भेसळयुक्त दुधासाठी फाशीची शिक्षा देता येत नाही, असं राष्ट्रपतींकडून सांगण्यात आलं. राज्यात 60 लाख लिटर भेसळयुक्त दूध विकलं जात नाही. पण, भेसळ होते, हे मान्य करतो. भेसळ अजिबात होता कामा नये, याच मताचे सरकार आहे."

ajit pawar baba atram bachhu kadu.
Eknath Shinde : विधान परिषदेसाठी मुख्यमंत्र्यांचा मास्टरप्लॅन तयार, महाविकास आघाडीला देणार धक्का !

"भेसळ रोखण्यासाठी कर्मचारी आणि तंत्रज्ञान लागत असेल, तर अन्न आणि औषध विभागाला पुरवण्यात येईल. मोठ्या ब्रँडचे खोटे पॅकेट्स तयार करून त्यात भेसळयुक्त दूध टाकून विकण्यात येते. त्यामुळे भेसळ करणाऱ्यांना मोठ्या प्रमाणात नफा मिळतो. भेसळयुक्त दुधामुळे आजार बळावतात याच्याशी सरकार सहमत आहे. याबाबत कडक भूमिका घेण्याची सरकारची तयारी आहे," असं अजित पवारांनी सांगितलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com