Uddhav Thackeray sarkarnama
मुंबई

Corporators Disqualification : उद्धव ठाकरेंचे चार नगरसेवक अपात्र ठरणार? पोटनिवडणुकीची तयारी सुरू

Shiv Sena UBT  Politics KDMC : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील चार नगरसेवक अपात्र ठरवण्याची प्रक्रिया पक्षाकडून सुरु करण्यात आली आहे.

Roshan More

Shiv Sena UBT : महापालिका निवडणुकीनंतर अनेक समीकरणे बदलली आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण डोंबिवलीमधील चार नगरसेवक निवडणूक झाल्यापासून पक्षाच्या संपर्कात नाहीत. त्यामुळे आपल्याच पक्षाच्या चार नगरसेवकांच्या विरोधात अपात्रतेची कारवाई करण्याची प्रक्रिया पक्षाकडून सुरू करण्यात आली असून त्या नगरसेवकांच्या प्रभात पक्षाकडून पोटनिवडणुकीची तयारी करत रणनीती देखील आखली जात आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मशाल चिन्हावर स्वप्नाली केणे,कीर्ति ढोणे, मधुर म्हात्रे, आणि राहुल कोट विजयी झाले होते. मात्र, विजयानंतर हे उमेदवार पक्षाच्या संपर्कात नाहीत. गटनोंदणी वेळी देखील हे चारही जण गैरहजर होते. ते बेपत्ता असल्याची तक्रार पक्षाकडून पोलिसांमध्ये करण्यात आली होती.

पक्षाकडून वारंवार या चारही जणांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर पक्षाकडून पक्षांतर बंदी कायद्याने कारवाई करण्यासाठी पावले उचलली आहेत. त्या दृष्टिने चार नगरसेवकांच्या घरी नोटीस बजवाण्यात आली आहे. घराच्या बाहेर देखील नोटीस लावण्यात आली आहे.

पोटनिवडणुकीची तयार...

बेपत्ता चारही नगरसेवक अपात्र ठरणार असल्याची पक्षाला खात्री आहे. त्यामुळे त्या नगरसेवकांच्या प्रभागात पोटनिवडणुकीची तयारी पक्षाकडून करण्यात आली आहे. त्यासाठी रणनीती आखली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT