Sanjay Raut Sarkarnama
मुंबई

Sanjay Raut: बाईकवरुन आलेल्या दोघांनी केली संजय राऊतांच्या बंगल्याची रेकी ; CCTV मध्ये कैद

Two Unknown bikers did recce of sanjay rauts residence in mumbai: दोघा व्यक्तीकडे ८ ते १० मोबाईल होते. त्या ठिकाणी थांबून दोघांनी पाहणी केली. त्यानंतर ते यू टर्न घेऊन निघून गेले. यातील एका व्यक्तीने आपला चेहरा पूर्णपणे झाकलेला होता.

Mangesh Mahale

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्या बंगल्याची रेकी केल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांचे पथक राऊतांच्या बंगल्यावर पोहचले आहेत.

याबाबतची माहिती ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी विधिमंडळ भवनात दिली. दुचाकीवरुन आलेल्या दोन जणांनी ही रेकी केल्याचे सीसीटीव्हीच्या फुटेजवरुन दिसते. खासदार राऊतांचे बंधू आमदार सुनील राऊत यांच्याही घराची रेकी झाल्याचे समजते.

संजय राऊत हे भांडूपमध्ये राहतात. मैत्री असे त्यांच्या बंगल्याचे नाव आहे. आज (२० डिसेंबर) सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरुन आलेल्या दोन जणांनी त्यांच्या घराची रेकी केली.

राऊत यांच्या घराच्या मागील बाजूस आज दुचाकीवरुन दोन अज्ञात व्यक्ती आल्याचे दिसते आहे. या दोघा व्यक्तीकडे ८ ते १० मोबाईल होते. त्या ठिकाणी थांबून दोघांनी पाहणी केली. त्यानंतर ते यू टर्न घेऊन निघून गेले. यातील एका व्यक्तीने आपला चेहरा पूर्णपणे झाकलेला होता. तर दुसऱ्या व्यक्तीने हेल्मेट घातलं होते.

या दोघांचा शोध पोलीस घेत आहेत. संजय राऊत यांच्या दिल्ली येथील निवासस्थान, सामना कार्यालयाची रेकी केल्याचा संशय सुनील राऊत यांनी व्यक्त केला आहे. रेकी करणाऱ्यांनी त्यांच्या बंगल्याचे फोटो काढले असल्याचे संजय राऊत म्हणाले. याप्रकरणी अद्याप कुणाही व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT