Aditya Thackeray Sarkarnama
मुंबई

Aditya Thackeray : विद्यार्थी आंदोलकांच्या कायदेशीर मदतीसाठी धावली ठाकरेसेना : आदित्य ठाकरेंनी केली मोठी घोषणा

Shiv Sena ubt help to Protest Student : नीट पेपरफुटी प्रकरणावर दिल्ली आणि मुंबईत आंदोलने तीव्र झाली आहेत. आंदोलकांना कायदेशीर मदत देण्याची घोषणा आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

Vijaykumar Dudhale

Mumbai, 21 July : नीट पेपर फुटीप्रकरणी दिल्लीत वेगवान घडामोडी घडत आहेत. कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांच्या नेतृत्वाखाली जंतर मंतरवर आंदोलन सुरूच ठेवले आहे. दुसरीकडे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधानांच्या घरासमोर आंदोलन करण्यात येत आहे. त्याचवेळी इकडे मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी आंदोलकांच्या कायदेशीर मदतीसाठी मोठी घोषणा केली आहे.

संसदेवर मोर्चा काढणाऱ्या आंदोलकांवर मोदी सरकारकडून लाठीहल्ला करण्यात आला. अनेक विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली आहे, तर काहींना कायदेशीर नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. आजही शंभरपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना पोलिस ठाण्यात डांबून ठेवण्यात आले होते, त्यांना मदत करण्यासाठी आमचे सहकारी पोलिस ठाण्यात गेले होते, असेही आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

नीटच्या परीक्षेसंदर्भात अभिजीत दीपके आणि सोनम वांगचूक यांना समर्थन देण्यासाठी आंदोलन करत आहेत. या आंदोलकांना कायदेशीर नोटीस आली असेल किंवा गुन्हा दाखल झाला असेल अशा विद्यार्थ्यांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून shivsenaubtlegal@gamil.com हा ईमेल जाहीर केला आहे.

गुन्हा दाखल झालेल्या किंवा कायदेशीर नोटीस आलेल्या विद्यार्थ्यांनी, तसेच आंदोलकांनी shivsenaubtlegal@gamil.com या मेलवर आमच्याशी संपर्क साधावा. या सर्वांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे राहू. या आंदोलकांना आम्ही मोफत कायदेशीर मदत करणार आहोत, असे आदित्य ठाकरेंनी जाहीर केले.

वकिलांना आवाहन

राज्यातील सर्व वकिलांनी या विद्यार्थ्यांच्या केसेस मोफत लढवाव्यात, असे आवाहन करून आदित्य ठाकरे म्हणाले, राज्यातील अशा वकिलांनी आमच्याशी संपर्क साधावा. आपण सर्वजण मिळून या विद्यार्थ्यांना साथ देऊ, त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहू, असे आवाहन आमदार आदित्य ठाकरे यांनी केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT