

Delhi Student Protest : कॉक्रोज जनता पार्टीने शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी सुरू केलेल्या आंदोलनावेळी पोलिसांनी जोरदार लाठीचार्ज करत अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. त्यानंतर तेथे एकच खळबळ उडाली. या सर्व धूमचक्रीत अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत. दरम्यान, आता पोलिसांनी फोडलेल्या अश्रुधुराच्या नळकांड्यांबाबत धक्कादायक माहिती समोर आली असून पोलिसांच्या आडून सरकार आंदोलकांच्या जीवाशी खेळ करत असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी वापरलेल्या अश्रुधुराच्या नळकांड्या मुदतबाह्य झाल्याचे समोर आले आहे.
दिल्लीतील जंतर-मंतर येथे कॉक्रोज जनता पार्टीने आंदोलन करत सोमवारी (ता. 20) 'चलो संसद' असा नारा दिला. त्यानंतर लाखोंच्या संख्येने विद्यार्थी आणि समर्थकांचा मोर्चा संसदेकडे निघाला. याचवेळी दिल्ली पोलिसांनी संसद परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप देत पूर्ण चक्काजाम केला. संसद परिसरात बॅरिकेडिंग करत आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला. तसेच आंदोलकांची धरपकड करण्यात आली.
यावेळी अनेक आंदोलक जखमी झाले असून त्यांच्यावर दिल्लीतील आरएमएल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अशातच आता एक 21 वर्षीय तरुणी पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये गंभीर जखमी झाली असून ती व्हेंटिलेटरवर असल्याचे समोर आले आहे. यामुळे एकच खळबळ उडाली असतानाच संसद मार्चदरम्यान झालेल्या हिंसाचारामध्ये पोलिसांकडून मुदत संपलेल्या अश्रुधुराच्या नळकांड्या वापरल्याचे समोर आले आहे.
सध्या याबाबत आंदोलकांचा एक व्हिडिओ व्हायरल होत असून या व्हिडिओमध्ये एका आंदोलकाने पोलिसांनी 'मुदत संपलेल्या' अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्याचा दावा केला आहे. तसेच या व्हिडिओत त्याने पोलिसांनी वापरलेली एक अश्रुधुराची नळकांडी दाखवली आहे.
ज्यात अश्रुधुराची नळकांडी 2022 मध्ये तयार करण्यात आली असून तिची मुदत ही २०२५ मध्ये संपल्याचे समोर आले आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओसंदर्भात आता संताप व्यक्त केला जात असून दिल्ली पोलीस आणि सरकारच्या भूमिकेवर टीका होत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.