Samant-Thackeray-Pawar Sarkarnama
मुंबई

Uddhav Thackeray, Sharad Pawar : ठाकरे, पवारांचे पक्ष पुन्हा फुटणार? विधानपरिषदेत महायुतीच्या विजयाचे उदय सामंतांनी मांडले गणित

Pradeep Pendhare

Mumbai News : विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी 12 जणचे अर्ज आले आहेत. यामुळे घोडेबाजार आता सुरू झाला आहे.महाविकास आघाडी आणि महायुतीतकडून आपलेच उमेदवार निवडणूक जिंकणार, असा दावा केला जात आहे. यातच शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नेते मंत्री उदय सामंत यांनी महाविकास आघाडी बाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे.

महाविकास आघाडीमधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे चार ते पाच आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे काही आमदार आमच्या संपर्कात आहे.त्यामुळे विधानपरिषदेचा निकाल आश्चर्यकारक लागेल,असा दावा मंत्री उदय सामंत यांनी केला.या दाव्यानुसार ठाकरे पक्ष आणि शरद पवार पक्ष पुन्हा एकदा फुटणार की काय,अशी चर्चा आहे.

विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी 11 जागांसाठी 12 जणांचे अर्ज आले आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये ह्या निवडणुकीवरून पुन्हा एकदा चुरस रंगली आहे. महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने यावेळी मिलिंद नार्वेकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. तसेच शेकापचे जयंत पाटील हे देखील महाविकास आघाडीकडून उमेदवार आहेत.

याबरोबरच काँग्रेसच्या प्रज्ञा सातव निवडणुकीच्या रिंगणात आहेत. काँग्रेसच्या (Congress) मतांना महाविकास आघाडीत डिमांड आहे. 11 जागांसाठी 12 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिल्यास चुरस निर्माण होईल. यातून घोडेबाजार होण्याची देखील शक्यता आहे. हे सर्व गृहीते लक्षात घेऊन महाविकास आघाडी आणि महायुती तयारीला लागली आहे.

शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार विजयी होतील.यासाठी निर्णायक मते मिळवू,असा दावा केला आहे.जयंत पाटलांचा हा दावा काही तासातच शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नेते मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी खोडून काढला.विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील काँग्रेसचे मते खूप महत्त्वाची आहेत.काँग्रेस काय भूमिका घेईल ते या निवडणुकीत होणार आहे.

काँग्रेसची मते जयंत पाटलांना पडतील,की मिलिंद नार्वेकरांना पडतील, यावर बरच काही विजयाची गणिते अवलंबून आहेत आणि तीच मते निवडणुकीला निर्णायक आहेत, असे मंत्री उदय सामंतांनी म्हटले.तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील चार ते पाच आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातील काही आमदार आमच्या संपर्कात आहेत. त्यामुळे विधान परिषदेच्या निवडणुकीचा निकाल आश्चर्यकारक लागेल, असा दावा मंत्री उदय सामंत यांनी केला.

(Edited by : Chaitanya Machale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT